RCBनं दिलं 'नासा'ला चॅलेंज अन् विराटच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ

अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'नं चांद्रयान-2 मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 10:07 AM2019-12-04T10:07:41+5:302019-12-04T10:08:20+5:30

whatsapp join usJoin us
RCB brutally trolled on Twitter after requesting NASA to find balls hit by Virat Kohli, AB de Villiers | RCBनं दिलं 'नासा'ला चॅलेंज अन् विराटच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ

RCBनं दिलं 'नासा'ला चॅलेंज अन् विराटच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'नंचांद्रयान-2 मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली. 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर अलगद उतरण्याऐवजी आदळून नष्ट झालेल्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील विक्रम लॅण्डरचे अवशेष नेमके कुठे व कशा अवस्थेत आहेत याचा शोध घेण्यात यश आले आहे. चेन्नईच्या षण्मुग सुब्रमणियन या तरुण अभियंत्याने दिलेल्या माहितीची मोलाची मदत झाली, अशी पोचपावती नासाने दिली आहे. या यशानंतर इंडियन प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं नासाला एक चॅलेंज दिलं. पण, विराट कोहलीच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ आली.

विक्रम लॅण्डरचे अवशेष शोधून काढण्याचे श्रेय या तरुणाला मिळाले आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. RCBनं त्यानंतर नासाला एक चॅलेंज दिलं. त्यांनी पोस्ट केली की,''नासाच्या टीमनं विक्रम लँडर शोधले. एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी टोलावलेला उत्तुंग चेंडू शोधण्यात त्यांनी आम्हाला मदत करावी.'' 


RCB च्या या चॅलेंजनंतर नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलं. आधी आयपीएल जिंका, असा सल्ला अनेकांनी दिला.

Web Title: RCB brutally trolled on Twitter after requesting NASA to find balls hit by Virat Kohli, AB de Villiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.