अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'नंचांद्रयान-2 मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली. 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर अलगद उतरण्याऐवजी आदळून नष्ट झालेल्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेतील विक्रम लॅण्डरचे अवशेष नेमके कुठे व कशा अवस्थेत आहेत याचा शोध घेण्यात यश आले आहे. चेन्नईच्या षण्मुग सुब्रमणियन या तरुण अभियंत्याने दिलेल्या माहितीची मोलाची मदत झाली, अशी पोचपावती नासाने दिली आहे. या यशानंतर इंडियन प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं नासाला एक चॅलेंज दिलं. पण, विराट कोहलीच्या संघावर तोंडावर आपटण्याची वेळ आली.
विक्रम लॅण्डरचे अवशेष शोधून काढण्याचे श्रेय या तरुणाला मिळाले आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. RCBनं त्यानंतर नासाला एक चॅलेंज दिलं. त्यांनी पोस्ट केली की,''नासाच्या टीमनं विक्रम लँडर शोधले. एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी टोलावलेला उत्तुंग चेंडू शोधण्यात त्यांनी आम्हाला मदत करावी.''