इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वासाठी सर्वच संघांनी रणनीती तयार केली आहे. 2008पासून एकही जेतेपद न जिंकलेल्या विराट कोहलीच्या ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challangers Bangalore) संघाकडून यंदाही अपेक्षा असणार आहेत. विराट, एबी डिव्हिलियर्स आदी मोठी आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू संघाकडे आहे, परंतु संघाला गरज असते तेव्हा त्यांच्याकडून साजेशी कामगिरी झालेली नाही, हा इतिहास आहे. पण, यंदा हा इतिहास बदलण्यासाठी विराट सज्ज आहे. पण, दुबईला रवाना होण्यापूर्वी 2025मधील विराटला टीम इंडियाच्या कर्णधारानं एक भावनिक पत्र लिहिलं...
आनंद पोटात मावेना... विराट कोहलीची IPL 2020 जेतेपदवाली Feeling; पाहा भन्नाट Video
" 2025च्या विराटला हाय... मी वर्तमानकाळातून प्रवास करत आज तुझ्यासोबत बसून हे पत्र वाचत बसलो असतो... 2020च्या बाबतीत तुला काय सांगू?, हे वर्ष कमी, तर असं वाटतंय की बुमराह आणि अॅलेन डोनाल्ड सलग 100 दिवस संपूर्ण जगातव भेदक मारा करत आहेत. पण, आज अचानक मन केलं, की तुला एक गोष्ट सांगावी. या काही दिवसांत मी स्वतःबद्दल आणि जगाबद्दल काय शिकलो...,''असे विराटनं लिहिलं.
IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी?
IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो
तो पुढे म्हणाला,''मला वाटायचं की मी स्वतःचे केस सहज कापू शकतो... पण, नंतर समजलं की ते न केलेलंच बरं. मी उत्तम कॉपी बनवू शकतो, हे मी शिकलो. नाक बंद करून गीत गाण अशक्य आहे... ट्राय करू नका स्टुपिड दिसाल. हा काळ सोपा नक्कीच नव्हता.. त्यात मैदानावरही उतरू शकत नव्हतो, त्यामुळे हा काळ अधिक आव्हानात्मक गेला. त्याचीही सवय करून घेतलं. पण, आपल्या जवळच्या व्यक्तिंना रोज सहा इंचाच्या स्क्रिनवर रोज भेटण्याची सवय, कधीच लावून घेऊ शकत नाही. 2020च्या या परिस्थिती आम्हा सोशली डिस्टन्स होतो, परंतु इमोशनली भरपूर जवळ होतो.''
IPL 2020 : रोहित शर्मासह Mumbai Indiansच्या खेळाडूंची पुन्हा झाली कोरोना टेस्ट; पाहा व्हिडीओ
''कोणत्याची आव्हानाची पहिली वॅक्सीन हे प्रेम आणि दया हीच असते, हे मी शिकलो. या कठीण प्रसंगात, काही लोकं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांचे आभार मानण्याची संधी तुला मिळतेय. भविष्यातील विराट... या सर्वांना मिठी मारून त्यांचे आभार मानायला विसरू नकोस. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे प्रयत्न कर...'' असेही विराटनं लिहिलं.
पाहा व्हिडीओ...
संपूर्ण वेळापत्रक (Royal challengers bangalore Time Table, IPL 2020)
21 सप्टेंबर, सोमवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई24 सप्टेंबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघएबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अॅरोन फिंच, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे, अॅडम झम्पा, ख्रिस मॉरिस