पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा प्रशिक्षक RCBला IPL 2024 मार्गदर्शन करणार; दोन महत्त्वाचे बदल 

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) हंगामासंदर्भात आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:34 PM2023-08-04T12:34:38+5:302023-08-04T12:35:18+5:30

whatsapp join usJoin us
RCB confirm Mike Hesson, Sanjay Bangar exits; Former LSG head coach Andy Flower takes over  | पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा प्रशिक्षक RCBला IPL 2024 मार्गदर्शन करणार; दोन महत्त्वाचे बदल 

पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा प्रशिक्षक RCBला IPL 2024 मार्गदर्शन करणार; दोन महत्त्वाचे बदल 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) हंगामासंदर्भात आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. आरसीबीने संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि क्रिकेट संचालक माइक हेसन यांना यांच्यासोबतच करार मोडला आहे. या दोघांच्या जागी आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्सचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.


RCB IPL 2023 च्या मोसमात सहाव्या स्थानावर होती. या संघाने १४ पैकी ७ सामने जिंकले होते. लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला होता. यासाठी आरसीबीही खूप चर्चेत आली होती. आता आरसीबीने त्याच लखनौ संघाचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे. आरसीबीचे माईक हेसन आणि संजय बांगर यांचा कार्यकाळ संपला होता आणि त्यात वाढ केली गेली नाही.


ट्विटरवर दोघांची माहिती देताना आरसीबीने म्हटले की, आम्ही माइक हेसन आणि संजय बांगर यांचे आभार मानतो. या दोघांची काम करण्याची पद्धत नेहमीच प्रभावी ठरली आहे. गेल्या चार वर्षांत त्याच्याकडून अनेक युवा खेळाडूंना खूप काही शिकायला मिळाले. या दोघांचाही करार आता संपला आहे. आम्ही हेसन आणि बांगर यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.


आयपीएलच्या इतिहासात २००८ पासून आरसीबी संघाला एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. अँडी फ्लॉवरच्या देखरेखीखाली, आरसीबी संघाला आयपीएल २०२४ मध्ये चमक दाखवायची आहे. 

अँडी फ्लॉवर यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी

  • ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता
  • कसोटी मेस विजेता
  • अॅशेस मालिका विजेता
  • कॅरेबियन प्रीमिअर लीग विजेता
  • पाकिस्तान सुपर लीग विजेता
  • दी हँड्रेड २०२२ विजेता
  • आंतरराष्ट्रीय लीजंड्स ट्वेंटी-२० लीग २०२३ विजेता
  • अबुधाबी टी-१० विजेता
  • आयपीएल २०२३ प्ले ऑफ

Web Title: RCB confirm Mike Hesson, Sanjay Bangar exits; Former LSG head coach Andy Flower takes over 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.