विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) हंगामासंदर्भात आपल्या संघात दोन मोठे बदल केले आहेत. आरसीबीने संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर आणि क्रिकेट संचालक माइक हेसन यांना यांच्यासोबतच करार मोडला आहे. या दोघांच्या जागी आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्सचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
RCB IPL 2023 च्या मोसमात सहाव्या स्थानावर होती. या संघाने १४ पैकी ७ सामने जिंकले होते. लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात जोरदार वाद झाला होता. यासाठी आरसीबीही खूप चर्चेत आली होती. आता आरसीबीने त्याच लखनौ संघाचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे. आरसीबीचे माईक हेसन आणि संजय बांगर यांचा कार्यकाळ संपला होता आणि त्यात वाढ केली गेली नाही.
आयपीएलच्या इतिहासात २००८ पासून आरसीबी संघाला एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. अँडी फ्लॉवरच्या देखरेखीखाली, आरसीबी संघाला आयपीएल २०२४ मध्ये चमक दाखवायची आहे.
अँडी फ्लॉवर यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी
- ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेता
- कसोटी मेस विजेता
- अॅशेस मालिका विजेता
- कॅरेबियन प्रीमिअर लीग विजेता
- पाकिस्तान सुपर लीग विजेता
- दी हँड्रेड २०२२ विजेता
- आंतरराष्ट्रीय लीजंड्स ट्वेंटी-२० लीग २०२३ विजेता
- अबुधाबी टी-१० विजेता
- आयपीएल २०२३ प्ले ऑफ