Join us  

RCB New Captain announced, IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने Virat Kohli चा राजीनामा स्वीकारला, नवा कर्णधार जाहीर केला 

RCB New Captain announced : इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 4:40 PM

Open in App

RCB New Captain announced: इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( Royal Challengers Bangalore) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पण, विराटच्या नेतृत्वाखालील अखेरच्या आयपीएलमध्येही RCBला जेतेपद पटकावता आले नाही. त्यानंतर IPL 2022 मध्ये RCB नवा कर्णधार जाहीर करेल हे निश्चित होते. पण, विराट कोहलीने दिलेला कर्णधारपदाचा राजीनामा फ्रँचायझीने स्वीकारला नसल्याच्या बातम्या समोर आल्या आणि चाहत्यांनाही विराटच पुन्हा कर्णधार बनेल असे वाटू लागले. पण, त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले. ग्लेन मॅक्सवेल सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्यामुळे RCBने आयपीएल २०२२साठी फॅफ ड्यू प्लेसिसची ( Faf Du Plessis) कर्णधार म्हणून निवड केली. 

आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये RCBने ७ कोटी रुपये मोजून फॅफला आपल्या ताफ्यात दाखल केले. फॅफने २०२१च्या आयपीएलमध्ये CSKसाठी १६ सामन्यांत ६३३ धावा कुटल्या होत्या आणि जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने एकूण १०० सामन्यांत २९३५ धावा केल्या आहेत आणि त्यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे

RCB चे आतापर्यंतचे कर्णधार  ( Captains of RCB in IPL)२००८ - राहुल द्रविड२००९ - केव्हिड पीटरसन / अनील कुंबळे२०१० - अनील कुंबळे२०११-१२ - डॅनिएल व्हिटोरी२०११- २१ - विराट कोहली  २०१७ - शेन वॉटसन२०२२ - फॅफ ड्यू प्लेसिस

IPL 2022 मधील सर्व संघाचे कर्णधार ( Captains in IPL 2022)

  • चेन्नई सुपर किंग्स - महेंद्रसिंग धोनी  
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत
  • कोलकाता नाइट रायडर्स - श्रेयस अय्यर
  • राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन 
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन  
  • लखनौ सुपर जायंट्स - लोकेश राहुल
  • गुजरात टायटन्स - हार्दिक पांड्या
  • पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - फॅफ ड्यू प्लेसिस  

 

RCB Full Sqaud -  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस ( ७ कोटी), हर्षल पटेल ( १०.७५ कोटी), वानींदू हसरंगा ( १२.२५ कोटी), दिनेश कार्तिक ( ५.५० कोटी), जोश हेझलवूड ( ७.७५ कोटी), शाहबाज अहमद ( २.४० कोटी) , अनुज रावत ( ३.४० कोटी), आकाश दीप ( २० लाख), महिपाल लोमरोर ( ९५ लाख), फिन अॅलेन ( ८० लाख), शेर्फाने रुथरफोर्ड ( १ कोटी), जेसन बेहरेनडॉर्फ ( ७५ लाख), सुयश प्रभुदेसाई ( ३० लाख), चामा मिलिंद ( २५ लाख), अनीश्वर गौतम ( २० लाख), लवनिथ सिसोदिया ( २० लाख), सिद्धार्थ कौल ( ७५ लाख), कर्ण शर्मा ( ५० लाख), डेव्हिड विली ( २ कोटी). Full Time Table of RCB

  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून    
  • १२ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १६ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १९ एप्रिल- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २३ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २६ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३० एप्रिल - गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ४ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ८ मे - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वानखेडे स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • १३ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १९ मे - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीएफ ड्यु प्लेसीस
Open in App