पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट

कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:48 PM2024-05-17T15:48:34+5:302024-05-17T15:48:59+5:30

whatsapp join usJoin us
RCB Qualification Scenario for Playoffs in this IPL 2024: RCB Might Not Qualify Even If They Beat CSK. check equation | पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट

पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB Qualification Scenario for Playoffs in IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांनी प्ले ऑफच्या जागा पक्क्या केल्या आहेत. त्यामुळे आता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला विजेता प्ले ऑफचे तिकीट पक्कं करणार आहे. पण, CSK ला फक्त विजय पुरेसा आहे, तर RCB ला विजयासह नेट रन रेटचं गणितही सोडवावं लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यातच लै कन्फ्युजन पाहायला मिळतंय... पहिली बँटींग करावी की लक्ष्याचा पाठलाग करावा? हा प्रश्न आहेच, परंतु जो निर्णय होईल त्यानंतर गणितांची जुळवाजुळव करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार हे नक्की..


CSK १४ गुणांसह सध्यातरी चौथ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचा नेट रन रेट हा ०.५२८ असा आहे. RCB हे १२ गुणांसह अजूनही शर्यतीत आहेत आणि लखनौ सुपर जायंट्सनाही ( १२ गुण) अंधुकशी संधी आहे. पण, तरीही खरा निकाल हा CSK vs RCB या सामन्यातूनच लागणार आहे. पण, बंगळुरूला फक्त विजय पुरेसा नाही. जर त्यांनी प्रथम फलंदाजी केली आणि २०० धावांचे लक्ष्य चेन्नईसमोर ठेवले, तर त्यांना हा सामना १८ धावांनी जिंकावा लागेल. जर त्यांचा विजयाचे अंतर हे १७ किंवा त्यापेक्षा कमी धावा राहिल्यास, नेट रन रेटच्या जोरावर चेन्नई प्ले ऑफमध्ये पोहोचेल. तेच RCBला २०१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग ११ चेंडू राखून करावा लागेल.

Image

 

SRH vs GT सामना काल रद्द झाल्याने नेमकं काय झालं?

  • सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफसाठी पात्र ठरले आणि दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेबाहेर फेकले गेले. 
  • सनरायझर्स हैदराबादला क्वालिफायर १च्या दुसऱ्या स्थानावर दावा सांगायचा असेल तर त्यांना पंजाब किंग्सविरुद्ध विजय मिळवावा लागेल आणि त्याचवेळी KKR ने RR चा पराभव करावा याची वाट पाहावी लागेल. ( दोन्ही सामने रविवारी आहेत) 
  • RCB ने शेवटच्या साखळी सामन्यात १८ धावांनी किंवा १८.१ षटकांत विजय मिळवल्यास ते प्ले ऑफसाठी पात्र ठरतील ( प्रथम फलंदीज करताना २०० धावा झाल्याचे गृहित धरल्यास)
  • CSK ने शेवटच्या साखळी सामन्यात RCB चा पराभव केला आणि RR व SRH आपापले सामने हरल्यास ऋतुराज गायकवाडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर दावा सांगेल
  • राजस्थान रॉयल्सने KKR ला पराभूत केल्यात ते क्वालिफायर १ मध्ये खेळतील.  

 

Web Title: RCB Qualification Scenario for Playoffs in this IPL 2024: RCB Might Not Qualify Even If They Beat CSK. check equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.