तगड्या फलंदाजांची फौज असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल) एकही जेतेपद पटकावता आलेलं नाही. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या मोसमात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCBला फेव्हरिट मानलं जात आहे. तीनवेळा अंतिम फेरीत प्रवेश करूनही कोहलीच्या संघाला जेतेपदानं हुलकावणी दिली. यंदा जेतेपदावर नाव कोरून दुष्काळ संपवण्याचा कोहलीचा निर्धार आहे.
संपूर्ण वेळापत्रक (Royal challengers bangalore Time Table, IPL 2020)21 सप्टेंबर, सोमवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई24 सप्टेंबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघएबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अॅरोन फिंच, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे, अॅडम झम्पा
IPL 2020 : मुंबई इंडियन्स कोणाशी व कधी भिडणार, जाणून घ्या रोहित शर्माच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक