PHOTOS : CSK vs RR सामना पाहत RCBच्या शिलेदारांची डिनर पार्टी; अनुष्का शर्माचीही हजेरी

rcb ipl team 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:38 PM2023-04-28T18:38:27+5:302023-04-28T18:39:02+5:30

whatsapp join usJoin us
RCB team players had dinner party watching CSK vs RR match in IPL 2023, Bollywood actress and Virat Kohli's wife Anushka Sharma also attended | PHOTOS : CSK vs RR सामना पाहत RCBच्या शिलेदारांची डिनर पार्टी; अनुष्का शर्माचीही हजेरी

PHOTOS : CSK vs RR सामना पाहत RCBच्या शिलेदारांची डिनर पार्टी; अनुष्का शर्माचीही हजेरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rcb ipl 2023 । नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. यंदाच्या हंगामातील पहिला टप्पा पार पडला असून जवळपास सर्वच संघांनी सात ते आठ सामने खेळले आहेत. गुणतालिकेत देखील रस्सीखेच होत असून राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आताच्या घडीला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. काल विराटच्या संघाने एकत्र डिनर पार्टी केली, ज्याचे फोटो फ्रँचायझीने शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, मोहम्मद सिराज, ग्लेन मॅक्सवेल आणि कर्ण शर्मा पाहायला मिळत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील फोटोंमध्ये दिसत आहे. यावेळी आरसीबीच्या शिलेदारांनी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्याचा आनंद लुटला. काल झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा ३२ धावांनी पराभव केला.

आरसीबीने यंदाच्या हंगामात आतापर्यंत ८ सामने खेळले असून चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सध्या आरसीबीचा संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत आहे. ८ गुणांसह पाचव्या स्थानावर असलेल्या विराटसेनेला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी आगामी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. संघाचे त्रिरत्न अर्थात विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस शानदार फॉर्ममध्ये आहेत.

आरसीबीचे आगामी सामने 

  1. १ मे विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स
  2. ६ मे विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स
  3. १४ मे विरूद्ध राजस्थान रॉयल्स
  4. १८ मे विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद
  5. २१ मे विरूद्ध गुजरात टायटन्स

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: RCB team players had dinner party watching CSK vs RR match in IPL 2023, Bollywood actress and Virat Kohli's wife Anushka Sharma also attended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.