इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)नंतर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांनी प्ले ऑफचं तिकिट पक्कं केलं. MI vs DC असा क्वालिफायर १ चा सामना ५ नोव्हेंबरला होईल. DCनं सोमवारी अखेरच्या साखळी सामन्यात RCBवर सहज विजय मिळवून १६ गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पक्के केले. या पराभवानंतरही RCBनं प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला. आता कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) सनरायझर्स हैदराबादच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. पण, RCBनं हे समिकरण कसं जुळवलं?
- DCनं विजयासह १६ गुण खात्यात जमा केले आणि -०.१०९ असा त्यांचा नेट रन रेट आहे.
- RCBनं पराभूत होऊनही त्यांचा नेट रन रेट हा -०.१७२ असा ठेवला आणि KKRपेक्षा ( -०.२१४) तो अधिकच राहिल्यानं त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का केला.
काय होतं गणित?
- दिल्ली कॅपिटल्सला किमान १३४ धावा तरी कराव्या लागतील, मग ते पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRपेक्षा सरस ठरतील.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला DC ला किमान १७.३ षटकं खेळवण्यास भाग पाडावं लागेल, त्यानंतर RCB पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRच्या पुढे राहतील.