इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा एकमेव संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. MIनं १८ गुणांसह अव्वल स्थान पक्कं केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांचे आव्हान संपुष्टात आले आहेत. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यातील विजेता प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का करेल. पण, पराभूत संघाचं काय? उभय संघांपैकी पराभूत संघालाही प्ले ऑफमधील जागा निश्चित करता येईल, परंतु त्यासाठी त्यांना गणित जुळवावे लागेल.
जोश फिलिफ आणि देवदत्त पडीक्कल यांनी RCBच्या डावाची सुरुवात केली. कागिसो रबाडानं पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिलिफ ( १२) माघारी पाठवले. त्यानंतर विराट कोहली व पडीक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. आर अश्विननं ही भागीदारी संपुष्टात आणताना कोहलीला ( २९) माघारी पाठवले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०व्या डावात आर अश्विननं प्रथमच विराटला बाद केलं. RCBच्या कर्णधाराला बाद करण्यासाठी अश्विनला १२५व्या चेंडूची वाट पाहावी लागली. पडीक्कलनं ४० षटकांत अर्धशतक पूर्ण केलं. IPL 2020मधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले. यासह त्यानं लोकेश राहुलच्या पाच अर्धशतकांशी बरोबरी केली.
पदार्पणात अनकॅप भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. शिखऱ धवननं २००८मध्ये दिल्ली डेअरडेव्हिलसाठी ४ अर्धशतकं झळकावली होती. श्रेयस अय्यरनं २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी ४ अर्धशतकं केली होती. पण, नॉर्ट्झेच्या एका षटकानं RCBला दणका दिला. अर्धशतकवीर पडीक्कल ( ५०) याचा त्रिफळा उडवल्यानंतर ख्रिस मॉरिसलाही ( ०) त्यानं झेलबाद केले. एबी डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे यांनी फटकेबाजी केली. २१ चेंडूंत ३५ धावा करणारा एबी अखेरच्या षटकात धावबाद झाला. RCBला ७ बाद १५२ धावाच करता आल्या. कागिसो रबाडानं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. नॉर्ट्झेनं ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
कसं आहे पात्रता फेरीचं गणित
- दिल्ली कॅपिटल्सला किमान १३४ धावा तरी कराव्या लागतील, मग ते पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRपेक्षा सरस ठरतील.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला DC ला किमान १७.३ षटकं खेळवण्यास भाग पाडावं लागेल, त्यानंतर RCB पराभूत होऊनही नेट रन रेटच्या जोरावर KKRच्या पुढे राहतील.
Web Title: RCB vs DC Latest News : Qualification scenario, RCB would need DC to bat at least 17.3 overs if they lose today to keep their NRR ahead of KKR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.