Join us  

RCB vs DC Latest News : आर अश्विनची 'ती' कृती पाहून प्रशिक्षक रिकी पाँटिंगलाही आवरले नाही हसू, Video

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) वर विजय मिळवला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 06, 2020 7:30 AM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं ( Delhi Capitals) सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) वर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) 9 बाद 137 धावा करता आल्या आणि दिल्लीनं 59 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहलीनं ( Virat Kohli) अनेक विक्रम मोडले. देवदत्त पडीक्कल ( Devdutta Padikkal) याचा सुपर कॅच आणि कागिसो रबाडा ( Kagiso Rabada) याचा टिच्चून मारा याने चाहत्यांची मनं जिंकली. पण, आर अश्विनच्या ( R Ashwin) एका कृतीनं पुन्हा चर्चेला तोंड फोडलं अन् DCचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यालाही हसू आवरले नाही.

IPL 2019च्या मोसमात अश्विननं किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे ( Kings XI Punjab) प्रतिनिधित्व करताना राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला मंकडींग पद्धतीनं बाद केलं होतं. त्यानंतर अश्विनच्या खिलाडूवृत्तीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. यंदा दिल्लीकडून खेळताना जेव्हा पाँटिंगला मंकडींग करणार का? असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यानं नकार दिला आणि आज अश्विननं त्याचा शब्द खाली पडू दिला नाही. धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या RCBचा फलंदाज आरोन फिंच क्रिज सोडून पुढे गेला अन् अश्विनला त्याला धावबाद करण्याची संधी होती. पण, अश्विननं मंकडींग न करता फिंचला ताकीद दिली. त्यानंतर दिल्लीच्या डग आऊटमध्ये बसलेला रिकी पाँटिंग हसू लागला.   

विराट कोहलीकडून मोठी चूक होणारच होती, पण तो वेळीच सावध झाला; पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

सामन्याचा काय निकाल लागला?पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वी शॉला ( 42 धावा) आणि शिखर धवन ( 32) बाद झाले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) स्वस्तात बाद करण्यात RCBला यश मिळाले. मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी 89 धावांची भागीदारी करून RCBच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. स्टॉयनिसला नशीबानंही साथ दिली, युजवेंद्र चहलनं त्याचा झेल सोडला, तर विराट कोहलीनं त्याला धावबाद करण्याची संधी गमावली. रिषभ पंत 37 धावांवर ( 3 चौकार व 2 षटकार) माघारी परतला. स्टॉयनिस 53 धावांवर नाबाद राहिला ( 6 चौकार व 2 षटकार). दिल्लीनं 4 बाद 196 धावा केल्या.  

प्रत्युत्तरात आरोन फिंचलाही ( Aaron Finch) कागिसो रबाडानं जीवदान दिले. पण, त्याला मोठी खेळी करता आली नाही. RCBचा इनफॉर्म फलंदाज देवदत्त पडीक्कलही आज स्वस्तात माघारी परतला. विराट आणि मोइन अली सामना DCच्या हातून काढतील असेच वाटत होते. पण, अली 11 धावांवर बाद झाला. 43 धावांवर विराटही बाद झाला. RCBनं तिथेच सामना गमावला. कागिसो रबाडानं ( Kagiso Rabada) 24 धावांत 4 विकेट्स घेतल्या. नॉर्ट्जे व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 196 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या RCBला 9 बाद 137 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना 59 धावांनी जिंकला. 

 

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआर अश्विनदिल्ली कॅपिटल्स