Join us  

RCB vs DC Latest News : विराट कोहलीकडून मोठी चूक होणारच होती, पण तो वेळीच सावध झाला; पाहा व्हिडीओ

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि रिषभ पंतनं धु धु धुतले...

By स्वदेश घाणेकर | Published: October 05, 2020 9:42 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) च्या गुणतालिकेतील अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challenger Banglore) संघानं नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आक्रमक सुरुवातीनंतर दिल्लीला सलग तीन धक्के बसले, परंतु मार्कस स्टॉयनिस आणि रिषभ पंत यांनी RCBचा सर्व डावच उधळला. या दोघांनी RCBच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेताना DCला मोठी धावसंख्या उभारून दिली. या सामन्यात विराट कोहलीकडून एक मोठी चूक होणारच होती, पण तो वेळीच सावध झाला.

मोईन अलीच्या जाळ्यात मोठा मासा; देवदत्त पडीक्कलनं टिपला अफलातून झेल, Video

पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पाच षटकात 50 धावा फलकावर चढवल्या. पृथ्वीची फटकेबाजी पाहून RCBचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या चेहऱ्यावरील चिडचिड स्पष्ट दिसत होती. सातव्या षटकात मोहम्मद सिराजनं RCBला यश मिळवून दिले. त्यानं चौथ्या चेंडूवर पृथ्वी शॉला ( 42 धावा) यष्टिरक्षक एबी डिव्हिलियर्सकरवी झेलबाद केले. त्यानंतर विराटनं एखाद्या मोठ्या फलंदाजाला बाद केले, असा जल्लोष केला. धवन आज पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठऱला. 10व्या षटकात इसुरू उदानानं ( Isuru Udana) त्याला 32 धावांवर माघारी पाठवले. 

पृथ्वी शॉची फटकेबाजी अन् विराट कोहलीच्या चेहऱ्यावर वाजले बारा, पाहा Video

त्यानंतर फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) स्वस्तात बाद करण्यात RCBला यश मिळाले. IPL 2020मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या मोईन अलीनं ( Moeen Ali) पहिल्याच षटकात RCBला यश मिळवून दिले. त्याच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारणाऱ्या अय्यरचा ( 11) सीमारेषेवर पडीक्कलनं अफलातून झेल घेतला. RCBच्या देवदत्त पडीक्कलने अफलातून झेल घेताना DCला मोठा धक्का दिला. पण, त्यानंतर मार्कस स्टॉयनिसनं ( Marcus Stoinis) RCBच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. 30 धावांवर असताना युजवेंद्र चहलनं ( Yuzvendra Chahal) त्याचा झेल सोडला. रिषभ पंतसह ( Rishabh Pant) त्यानं 29 चेंडूंत 50+ धावा कुटल्या.

मार्कस स्टॉयनिसला धावबाद करण्याची सोपी संधी RCBकडे चालून आली होती. 17व्या षटकाच्या 3 ऱ्या चेंडूवर स्टॉयनिसनं चेंडू टोलावला. एक धाव पूर्ण झाल्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी स्टॉयनिसनं क्रीज सोडलं होतं. तोपर्यंत विराटच्या हाती चेंडू आला होता. पण, विराटनं सोपी संधी गमावली अन् स्टॉयनिसनं त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली. सिराजनं DCची सेट जोडी तोडली. रिषभ पंत 37 धावांवर ( 3 चौकार व 2 षटकार) माघारी परतला. त्यानं स्टॉयनिससह 89 धावा जोडल्या. स्टॉयनिसनं 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. स्टॉयनिस 53 धावांवर नाबाद राहिला ( 6 चौकार व 2 षटकार). दिल्लीनं 4 बाद 196 धावा केल्या. 

क्षेत्ररक्षणादरम्यान विराट कोहली चेंडूला थुंकी लावणारच होता, परंतु त्याला वेळीच नियम आठवला. कोरनो व्हायरसमुळे चेंडूला लाळ/थुंकी न लावण्याचा नियम आणला आहे. तोच नियम विराट थोड्या वेळासाठी विसरलाच होता, पण...

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :IPL 2020विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स