बंगळुरू : सलामीवीर ख्रिस लीन (६२*) याने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने ६ बळींनी शानदार विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान परतवले. आरसीबीने दिलेले १७६ धावांचे आव्हान केकेआरने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १९.१ षटकांत पार केले. यासह केकेआरने ८ गुणांसह आपले चौथे स्थान कायम राखले, तर आरसीबी आणखी एका पराभवासह सातव्या स्थानी कायम आहे.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून केकेआरने आरसीबीला ४ बाद १७५ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना लीनने सुनील नरेनसह (२७) संघाला ५९ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. मुरुगन आश्विनने नरेनला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर रॉबिन उथप्पा (२१ चेंडूंत ३६), कर्णधार दिनेश कार्तिक (१० चेंडूंत २३) यांनी लीनला उपयुक्त साथ दिली. लीनने अखेरपर्यंत टिकून राहताना ५२ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह नाबाद ६२ धावांची विजयी खेळी केली. मोहम्मद सिराज आणि मुरुगन आश्विन यांंनी प्रत्येकी २ बळी घेत केकेआरला रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ६८ धावांच्या जोरावर आरसीबीने आव्हानात्मक मजल मारली. क्विंटन डीकॉक (२९) आणि ब्रेंडन मॅक्युलम (३८) यांनी संघाला ६७ धावांची सलामी दिल्यानंतर ‘बर्थडे बॉय’ आंद्रे रसेलने तीन महत्त्वपूर्ण बळी घेत आरसीबीच्या धावगतीला ब्रेक दिला. मात्र, कोहलीने एका बाजूने खंबीरपणे लढताना संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६८ धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : २० षटकांत ४ बाद १७५ धावा (विराट कोहली नाबाद ६८, ब्रेंडन मॅक्युलम ३८; आंद्रे रसेल ३/३१) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १९.१ षटकांत ४ बाद १७६ धावा (ख्रिस लीन नाबाद ६२, रॉबिन उथप्पा ३६; मुरुगन आश्विन २/३६, मोहम्मद सिराज २/४०).
कोलकात्याचा बंगळुवर सहा विकेटने विजय
कोलकात्याला विजयासाठी चार षटकांत 43 धावांची गरज
ख्रिस लिनने झळकावले दमदार अर्धशतक
पावसाच्या व्यत्ययानंतर खेळाला पुन्हा सुरूवात
10.23PM : पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सुरू असलेल्या लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसाचा व्यत्यय येऊन खेळ थांबला तेव्हा कोलकात्याच्या 6.3 षटकांत बिनबाद 55 धावा झाल्या होत्या.
10.16PM : कोलकाता नाइट रायडर्सचे अर्धशतक पूर्ण
- ख्रिस लिन आणि सुनील नारायण यांनी कोलकाता नाइटरायडर्ससाठी अर्धशतकी सलामी दिली आहे. सहा षटकांअखेर कोलकात्याच्या बिनबाद 51 धावा झाल्या आहेत.
10.05PM : सुनील नारायणची फटकेबाजी, कोलकात्याच्या तीन षटकांत 29 धावा
- मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाइटरायडर्सने आक्रमक सुरुवात केली आहे. सुनील नारायणने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला असून, पहिल्या तीन षटकांत कोलकात्याच्या धावफलकावर 29 धावा लागल्या आहेत.
कॅप्टन कोहलीचे दमदार अर्धशतक, कोलकात्यासमोर 176 धावांचे आव्हान
बंगळुरू - कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्ससमोर 176 धावांचे आव्हान ठेवले. क्विंटन डी कॉक आणि ब्रँडन मॅक्युलमने दिलेल्या सावध अर्धशतकी सलामीनंतर बंगळुरूचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. मात्र कर्णधार विराट कोहलीने एक बाजू लावून धरत बंगळुरूचा डाव सावरला. विराटने शानदार अर्धशतकी खेळी करताना नाबाद 68 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने मनदीप सिंहसोबत 65 आणि कॉलिन डी ग्रँडहोमेसोबत 35 धावांची भागीदारी करत संघाला 175 धावांपर्यंत मजल मारून दिली.
9. 33 PM : बंगळुरूचे कोलकात्यासमोर 176 धावांचे आव्हान
- कर्णधार विराट कोहलीने फटकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 175 धावा फटकावून कोलकाता नाइटरायडर्ससमोर 175 धावांचे आव्हान ठेवले.
9.22 PM : कँप्टन कोहलीचे अर्धशतक पूर्ण
- विराट कोहलीने 37 चेंडूत पूर्ण केले आपले अर्धशतक. कोहलीचे यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे अर्धशतक.
9. 19 PM : मनदीप सिंह बाद, बंगळुरूला चौथा धक्का
- मनदीप सिंह 19 धावा काढून बाद झाला. आंद्रे रसेलने टिपला सामन्यातील तिसरा बळी
9.16 PM : विराट-मनदीपची अर्धशतकी भागीदारी
- विराट कोहली आणि मनदीप सिंह यांनी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर बंगळुरूने 17 षटकांअखेर 3 बाद 133 धावांपर्यंत मजल मारली आहे.
9.04 PM : बंगळुरूचे शतक फलकावर
- तीन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मनदीप सिंहच्या साथीने बंगळुरूचा डाव सावरला आहे. 14 षटकांअखेर बंगळुरूने 3 बाद 100 अशी मजल मारली आहे.
8.48 PM : रसेलने एकाच षटकात दिले दोन धक्के, बंगळुरूचा डाव अडखळला
- सावध सुरुवात करणाऱ्या बंगळुरूला आंद्रे रसेलने एकाच षटकात दोन धक्के दिले आहेत. ब्रँडन मॅक्क्युलम (38) आणि मनन वोहरा (0) हे बाद झाल्याने दहा षटकांअखेर बंगळुरूच्या 3 बाद 75 धावा झाल्या होत्या.
8.38 PM : बंगळुरूला पहिला धक्का
- क्विंटन डी कॉक 29 धावा काढून कुलदीप यादवची शिकार झाला. 8.1 षटकांनंतर बंगळुरूची धावसंख्या 1 बाद 67
8. 30 PM : बंगळुरूचे अर्धशतक फलकावर
- सातव्या षटकाच्या अखेरीस बंगळुरूचे अर्धशतक फलकावर लागले आहे. बंगळुरूच्या 7 षटकांत बिनबाद 52 धावा.
8. 24 PM : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सावध सुरुवात
- कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सावध सुरुवात केली असून पहिल्या सहा षटकांअखेरीच बंगळुरूच्या बिनबाद 40 धावा झाल्या आहेत.
7.30 PM : कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होत असलेल्या महत्त्वपूर्ण लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे.
बंगळुरु - मागच्या सामन्यात सपाटून मार खाणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज रविवारी विजयाच्या प्रतीक्षेत आहे.दोन विजय आणि चार पराभवामुळे आरसीबी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरला तर केकेआरने तीन विजय आणि चार पराभवानंतर चौथे स्थान गाठले.
Web Title: RCB vs KKR, IPL 2018 LIVE: RCB vs KKR Match News
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.