RCB vs KKR IPL :आरसीबीला पहिल्या विजेतेपदाची संधी; आज केकेआरशी होणार सामना, विराटकडून मोठ्या अपेक्षा

"आमच्याजवळ असलेला संघाची असे करण्याची क्षमता आहे. परंतु, केकेआर संघासाठी हे तेवढे सोपे नाही. कारण त्यांचा कोहलीत्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाशी अजून सामना झालेला नाही."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:10 PM2021-09-20T14:10:30+5:302021-09-20T14:15:52+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs KKR IPL: RCB first chance to win; Today's match will be against KKR, big expectations from Virat | RCB vs KKR IPL :आरसीबीला पहिल्या विजेतेपदाची संधी; आज केकेआरशी होणार सामना, विराटकडून मोठ्या अपेक्षा

RCB vs KKR IPL :आरसीबीला पहिल्या विजेतेपदाची संधी; आज केकेआरशी होणार सामना, विराटकडून मोठ्या अपेक्षा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएलच्या २०२१ च्या दुसऱ्या टप्पात सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या हंगामाती पहिल्या टप्प्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सात पैकी पाच सामने जिंकणारा आरसीबी संघ आपली गती कामय ठेवण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. तर दोन वेळचा (२०१२ आणि २०१३) विजेता केकेआर आपल्या नव्या टप्प्याची सुरूवात करताना स्पर्धेत टीकून राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आरसीही आठ सामन्यांतून १० गुण प्राप्त करत तिसऱ्या स्थानी तर सात सामन्यांतून केवळ २ विजयांसह केकेआर ७ व्या स्थानी आहे. 

कोलकाताचे पारडे जड इयॉन मॉर्गन याच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाला २०१४ प्रमाणेच नशीबाने साथ दिली तर ते विजेतपद पटकावण्याच्या तयारीत आहेत. संघाचे मेंटॉर डेव्हिड हसी यांना याबद्दल खात्री आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘ आम्हाला जिंकण्यासाठीच खेळावे लागणार. यापूर्वीही असे करून दाखवले आहे. ते पुन्हा करू शकतो. आमच्याजवळ असलेला संघाची असे करण्याची क्षमता आहे. परंतु, केकेआर संघासाठी हे तेवढे सोपे नाही. कारण त्यांचा कोहलीत्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाशी अजून सामना झालेला नाही. या दोन्ही संघामध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत. ज्यातील केकेआरने १४ तर आरसीबीने १३ सामने जिंकले आहेत. 


या खेळाडूंपासून अपेक्षा पहिल्या टप्प्यात आरसीबीने आरसीबीने कोलकाताल यापूर्वीच्या सामन्यात ३८ धावांनी पराभूत केले होते. केकेआरची भिस्त शुभमन गिली आणि नितीश राणा यांच्यावर असेल. परंतु, हे दोन्ही खेळाडून पहिल्या टप्प्यात चांगले प्रदर्शन करण्यात आपयशी ठरले आहेत.

मुंबईचं नेमकं कुठं चुकलं? अन् ऋतुराजनं काय हेरलं? मुद्देसूद विश्लेषण वाचा सोप्या शब्दात...
 
२०२१ च्या आयपीएलच्या पहिल्या चरणात सात सामन्यांतून गिलने केवळ १३२ धावा तर राणाने २०१ धावा केल्या आहेत. त्याबरोबरच मॉर्गनलाही चांगली खेळी करावी लागणार आहे. दिनेश कार्तीक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी आणि शाकिब अल हसन यांनाही सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. त्याबरोबरच न्यूझीलंड संघातील गोलंदाज टिम साउदी याच्यावर मोठी जबबाबदारी असेले. यावेळी त्याला पॅट कमिन्सची साथ लाभणार आहे. 

दोन्ही संघ या प्रमाणे : 
केकेआर
: इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तीक, गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंह, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पवन नेगी, एम. प्रसिद्ध कृष्णा, संदीप वारियर, शिवम दुबे, टिम साउदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, शेल्डन जैक्सन, टिम सीफर्ट. 

आरसीबी : विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन क्रिस्टियन, रजत पाटीदार, दुष्मंत चमीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सीराज, हर्षल पटेल, मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन बेबी, वाहिंदु हसरंगा, जॉर्ज गार्टन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, काइल जॅमीसन, सुयश प्रभुदेसाई, के.एस. भरत, टिम  डेव्हिड, आकाश दीप, एबी डिविलियर्स.

आरसीबीची स्फोटक फलंदाजी
आरसीबी संघ पहिल्या टप्प्यात चांगल्या स्थिती आहे. कोहली मुक्तपणे फलंदाजी करू शकतो. ग्लेन मॅक्सवेल आणि ए. बी. डिव्हिलियर्स यांनी पहिल्या टप्पात जोरदार प्रदर्शन केले आहे. आरसीबीची फलंदाजी सध्या मजबूत आहे. त्यामुळे कोहली आणि देवदत्त पडिक्कल चांगली सुरूवात करण्याची अपेक्षा आहे. त्यांना हर्षल पटेल, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल यांच्या गोलंदाजीची साथ मिळेल. चहल टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठई भारतीय संघात निवडला गेलेला नाही. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याची त्याला मोठी संधी आहे. 
 

Web Title: RCB vs KKR IPL: RCB first chance to win; Today's match will be against KKR, big expectations from Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.