Join us  

RCB Vs KKR- IPL2023: इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात एन्ट्री केली अन् आरसीबीची हवाच काढली; सुयश शर्मा कोण आहे?

RCB Vs KKR- IPL2023: शार्दूल ठाकूर आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आक्रमक अर्धशतक आणि वरुण चक्रवर्थी व सुयश शर्मा यांची शानदार फिरकी कोलकाताच्या विजयात निर्णायक ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 9:44 AM

Open in App

कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) नाट्यमय ठरलेल्या लढतीत तब्बल ८१ धावांनी विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) हातातून सामना खेचून आणला.  प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाताने अडखळत्या सुरुवातीनंतरही २० षटकांत ७ बाद २०४ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी आरसीबीला १७.४ षटकांमध्ये केवळ १२३ धावांत गुंडाळले. 

शार्दूल ठाकूर आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आक्रमक अर्धशतक आणि वरुण चक्रवर्थी व सुयश शर्मा यांची शानदार फिरकी कोलकाताच्या विजयात निर्णायक ठरले. धावांचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, पाचव्या षटकात सुनील नरेनने कोहलीला बाद केले आणि यानंतर आरसीबीच्या फलंदाजीला गळती लागली. आरसीबीकडून कोणालाही खेळपट्टीवर फारवेळ तग धरता आला नाही. 

शार्दूल, शाहरुख सोडा, सामना पाहायला आलेल्या 'या' तरुणीची रंगली चर्चा; तुम्ही ओळखलं ना?

युवा सुयश शर्माने स्वप्नवत आयपीएल पदार्पण करताना आरसीबीची हवा काढली. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सुयश शर्माने आरसीबीविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात सुयशने तीन विकेट्स घेतल्या. या सामन्यात सुयशने दिनेश कार्तिक, अनुज रावत आणि कर्ण शर्मा यांची विकेट घेतली. सुयशने आपल्या ४ षटकात ३० धावा देत ३ विकेट्, घेतल्या.

सुयशचे नाव केकेआरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हते, पण तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. कोलकाता संघात व्यंकटेश अय्यरच्या जागी सुयशने एन्ट्री केली. सुयश शर्मा हा दिल्लीचा आहे आणि विशेष बाब म्हणजे याआधी त्याने एकही लिस्ट ए, फर्स्ट क्लास किंवा टी-20 सामना खेळलेला नाही. स्पर्धात्मक क्रिकेटमधला हा त्याचा पहिलाच सामना होता, पण पहिल्याच सामन्यात अप्रतिम गोलंदाजीने करत सर्वांच्या मनावर छाप पाडली. सुयश शर्मा दिल्ली अंडर-२५ संघाकडून खेळतो.

प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर सलामीवीर रहमानुल्लाहने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याच्यामुळे काहीसे पुनरागमन केलेल्या कोलकाताला शार्दुलने भक्कम स्थितीत आणताना स्फोटक अर्धशतक झळकावले. त्यामुळे एकवेळ १४० धावाही कठीण दिसत असलेल्या कोलकाताने द्विशतक झळकावले. कोलकाताने अर्धा संघ ८९ धावांत गमावला होता. गुरबाझने रिंकू सिंगसोबत ३१ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केल्यानंतर शार्दुलने रिंकूसोबत सहाव्या गड्यासाठी ४७ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी केली. शार्दूलने अवघ्या २० चेंडूत आयपीएलमधील पहिलेच वैयक्तिक अर्धशतक झळकवले.

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App