Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात परतीचा सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मोहम्मद सिराजनं त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. KKRचे चार फलंदाज अवघ्या 14 धावांवर माघारी परतले होते. सिराजनं सलग दोन चेंडूंत दोन विकेट्स घेतल्या. सिराजचा झंझावात इथेच थांबला नाही. RCBच्या गोलंदाजांनी आजच्या सामन्यात 13वर्षांत कोणालाच न जमलेला विक्रम केला.
राहुल त्रिपाठीला दुसऱ्याच षटकात बाद करून मोहम्मद सिराजनं RCBला पहिले यश मिळवून दिले. KKRला 3 धावांवर पहिला धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर नितिश राणाचा त्रिफळा उडवून सिराजनं KKRला मोठा हादरा दिला. टॉम बँटननं त्याला हॅटट्रिक होऊ दिली नाही. पण, पुढील षटकात नवदीप सैनीनं ती कसर भरून काढली. शुबमन गिल ( 1) झेलबाद झाल्यानं KKRची अवस्था 3 बाद 3 धावा अशी झाली. कोलकाताचं विकेट पडण्याचं सत्र काय राहिले. सिराजनं चौथ्या षटकांत टॉम बँटनला ( 10) झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानं 2 षटकांत एकही धाव न देता 3 विकेट्स घेतल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - देवदत्त पडीक्कल, आरोन फिचं, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, इसुरू उदाना, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.