मोहम्मद सिराज याने रॉयल चँलेंजर्स बंगळुरू कडून खेळताना ८ धावा देत कोलकाता नाईट रायडर्सचे तीन बळी मिळवले. त्याची ही कामगिरी यंदाच्या सत्रातील सर्वात चांगली गोलंदाजी राहीली आहे. मात्र आयपीएलच्या सर्व सत्रांचा विचार केला असता तो या यादीत चौथ्या स्थानावर आला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर आशिष नेहरा आणि युझवेंद्र चहल संयुक्त रित्या आहे.
या दोघांनीही आपल्या चार षटकांत १ निर्धाव सहा धावा आणि एक बळी अशी कामगिरी केली आहे. नेहराने ही कामगिरी दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात केली होती. तर चहलने आरसीबीकडून खेळताना सीएसकेला घाम फोडला होता. आयपीएलच्या काही मोजक्या सत्रात खेळलेल्या राहुल शर्मा याने देखील ४ षटकांत फक्त सात धावा देत दोन बळी मिळवले होते. त्याने पुणे वॉरीयर्स इंडिया कडून खेळताना मुंबई इंडियन्सला जेरीस आणले होते. तर आज सिराज याने केकेआरची आघाडीची फळीच बाद करत या यादीत स्थान मिळवले. सिराजसोबतच चहल आणि सॅम्युअल बद्री यांनीही अशीच कामगिरी आरसीबीसाठी केली होती.
सर्वात फायदेशीर गोलंदाजी -आशिष नेहरा दिल्ली डेअरडेविल्स ४-१-६-१ वि. पंजाबयुझवेंद्र चहल आरसीबी ४-१-६-१ वि. चेन्नईराहुल शर्मा पुणे वॉरीयर्स ४-०-७-२ वि.मुंबई इंडियन्स
फक्त आरसीबीसाठी फायदेशीर गोलंदाजीयुझवेंद्र चहल आरसीबी ४-१-६-१ वि. चेन्नईमोहम्मद सिराज ४-२-८-३ वि. केकेआर