Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात परतीचा सामना सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आंद्रे रसेलला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी संघात टॉम बँटन याला स्थान दिले आहे. याशिवाय शिवम मावीच्या जागी प्रसिध कृष्णा याची एन्ट्री झाली आहे. पण, आजच्या सामन्यात KKRनं एक मोठा निर्णय घेतला आणि तब्बल 8 वर्षांननंतर संघात महत्त्वाचा बदल दिसणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स - शुबमन गिल, टॉम बँटन, नितिश राणा, इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, पॅट कमिन्स, ल्युकी फर्ग्युसन, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्थी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - देवदत्त पडीक्कल, आरोन फिचं, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकिरत सिंग मान, वॉशिंग्टन सुंदर, ख्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, इसुरू उदाना, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल.
कोलकाता नाईट रायडर्स 10 एप्रिल 2012नंतर प्रथमच सुनील नरीन आणि आंद्रे रसेल या दोन्ही खेळाडूंशिवाय मैदानावर उतरणार आहेत. 2012 मध्ये RCBविरुद्ध ही जोडी सामन्याला मुकली होती आणि आज पुन्हा RCBविरुद्धच त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. या कालावधीत KKR नरीन किंवा रसेल यांच्यापैकी एकाचा तरी अंतिम 11मध्ये सहभाग ठेवत 129 सामने खेळले आहेत.
आंद्रे रसेलला यंदाच्या मोसमात 9 सामन्यांत 92 धावा करता आल्या आहेत आणि 6 विकेट्स घेतल्या आहेत. नरीनने 6 सामन्यांत 44 धावा केल्या, तर 4 विकेट्स