Join us  

RCB vs KKR Latest News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहज विजय; मुंबई इंडियन्सला खेचले खाली

RCB vs KKR Latest News : मोहम्मद सिराजनं 4 षटकांत 8 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. त्यात त्यानं दोन निर्धाव षटकही टाकली. युजवेंद्र चहलने दोन विकेट्स घेतल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: October 21, 2020 10:23 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाच्या गोलंदाजांनी कमालच केली. कोलकाता नाईट रायडर्सच्या ( Kolkata Knight Riders) फलंदाजांना त्यांनी झटपट गुंडाळले आणि त्यानंतर फलंदाजांनी सहज विजय मिळवून दिला. या विजयासह RCBनं 14 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेताना मुंबई इंडियन्सला तिसऱ्या स्थानी ढकलले. 

KKRनं नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, मोहम्मद सिराजनं त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. राहुल त्रिपाठीला दुसऱ्याच षटकात बाद करून मोहम्मद सिराजनं RCBला पहिले यश मिळवून दिले. KKRला 3 धावांवर पहिला धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर नितिश राणाचा त्रिफळा उडवून सिराजनं KKRला मोठा हादरा दिला. टॉम बँटननं त्याला हॅटट्रिक होऊ दिली नाही. पण, पुढील षटकात नवदीप सैनीनं ती कसर भरून काढली. शुबमन गिल ( 1) झेलबाद झाल्यानं KKRची अवस्था 3 बाद 3 धावा अशी झाली. कोलकाताचं विकेट पडण्याचं सत्र काय राहिले. सिराजनं चौथ्या षटकांत टॉम बँटनला ( 10) झेलबाद करून माघारी पाठवले.   

युजवेंद्र चहलनंही त्याच्या पहिल्याच षटकात KKRच्या दिनेश कार्तिकला पायचीत केलं. कोलकाताचा निम्मा संघ 35 धावांत माघारी परतला होता. पॅट कमिन्सही ( 4) चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार इयॉन मॉर्गन KKRला समाधानकारक पल्ला गाठून देईल असे वाटत होते. पण, वॉशिंग्टन सुंदरनं 16व्या षटकात मॉर्गनला बाद केले. मॉर्गननं 3 चौकार व 1 षटकारासह 30 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 8 बाद 84 धावांवर समाधान मानावे लागले. 

RCBला हे लक्ष्य पार करताना फार कष्ट घ्यावे लागले नाही. देवदत्त पडीक्कल आणि आरोन फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. फिंच 16 धावांवर माघारी परतला. ल्युकी फर्ग्युसननं त्याला बाद केले. त्याच षटकात पडीक्कल ( 25) धावबाद झाला. विराट कोहली ( 21*) आणि गुरकीरत सिंग मान ( 18*) यांनी RCBचा विजय पक्का केला. RCBनं 8 विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स