कोहलीने अनुष्काला दिले विजयाचे ' गिफ्ट '; मुंबईवर 14 धावांनी मात
बंगळुरु : अनुष्का शर्मा आपल्या वाढदिवशी आयपीएलचा सामना बघायला आली तेव्हा बऱ्याच जणांनी त्यावर विनोद करायला सुरुवात केली होती. पण विराट कोहलीने मात्र अनुष्काला वाढदिवसाची विजयी भेट देत त्या विनोदवीरांना चोख उत्तर दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सवर 14 धावांनी विजय मिळवला. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने बिनीचे तीन फलंदाज फक्त 21 धावांत गमावले. त्यानंतर हार्दिक पंड्याने (50) अर्धशतक झळकावत मुंबईला विजयाची आशा दाखवली होती. पण अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक बाद झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. बंगळुरुकडून टीम साऊथी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत संघाच्या विजयाचा मोलाचा वाटा उचलला.
11.35 PM : बंगळुरुचा मुंबईवर 14 धावांनी विजय
11.32 PM : मुंबईला सातवा धक्का; हार्दिक पंड्या बाद
- विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर साऊथीने हार्दिकला बाद केले, हार्दिकने 42 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 50 धावा केल्या.
11.28 PM : मुंबईला सहावा धक्का; कृणाल पंड्या बाद
- बंगळुरुचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कृणाल पंड्याला बाद करत मुंबईला सहावा धक्का दिला.
11.23 PM : मुंबईला विजयासाठी 12 चेंडूंत 30 धावांची गरज
11.19 PM : मुंबईला विजयासाठी 18 चेंडूंत 35 धावांची गरज
11.15 PM : मुंबईला विजयासाठी 24 चेंडूंत 45 धावांची गरज
11.14 PM : कृणाल पंड्याचा दमदार षटकार
- सोळाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कृणालने षटकार लगावला आणि मुंबईच्या विजयाचा आशा जीवंत ठेवल्या.
11.12 PM : मुंबईला विजयासाठी 30 चेंडूंत 62 धावांची गरज
11.10 PM : मुंबई 15 षटकांत 5 बाद 106
11.03 PM : मुंबईला विजयासाठी 36 चेंडूंत 68 धावांची गरज
11.01 PM : मुंबईचे चौदाव्या षटकात शतक पूर्ण
10.51 PM : मुंबईला पाचवा धक्का; ड्युमिनी धावचीत
- मुंबईचा डाव सावरणाऱ्या जेपी ड्युमिनीने धावचीत होत आत्मघात केला. ड्युमिनीने तीन चौकारांच्या जोरावर 23 धावा केल्या.
10.44 PM : मुंबई 10 षटकांत 4 बाद 77
10.31 PM : कायरन पोलार्ड OUT ; मुंबईला चौथा धक्का
- मोहम्मद सिराजने आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डला बाद करत मुंबईला चौथा धक्का दिला.
10.18 PM : मुंबई पाच षटकांत 3 बाद 29
10.06 PM : मुंबईला मोठा धक्का; रोहित शर्मा बाद
- तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उमेश यादवने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला बाद केले. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
10.05 PM : सूर्यकुमार यादव बाद; मुंबईला दुसरा धक्का
- उमेश यादवने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवला बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला.
9.53 PM : मुंबईला पहिला धक्का; इशान किशन बाद
- बंगळुरुचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मुंबईचा सलामीवीर इशान किशनला बाद केले.
हार्दिक पंड्याचे एका षटकात तीन बळी; बंगळुरुचे 167 धावांवर समाधान
बंगळुरु : मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने एकाच षटकात तीन बळी मिळवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या धावसंख्येला वेसण घातले. मुंबईने अखेरच्या काही षटकांत भेदक गोलंदाजी केल्यामुळे बंगळुरुला 167 धावांवर समाधान मानावे लागले.
मनन व्होराने धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरुला चांगली सुरुवात करून दिली. व्होराने 31 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 45 धावा केल्या. व्होरानंतर ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार विराट कोहली यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली, पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. मॅक्युलमने 25 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 37 धावा केल्या. पंड्याने अठराव्या षटकात कोहलीसह अन्य दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि धावसंख्येला लगाम लावला. कोहलीने 26 चेंडूंत 2 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 32 धावा केल्या. अखेरच्या षटकामध्ये कॉलिन डी ग्रँडहोमने तीन षटकारांसह 24 धावांची लूट केल्यामुळेच बंगळुरुला दीडशे धावांचा पल्ला ओलांडता आला.
9.33 PM : बंगळुरुचे मुंबईपुढे 168 धावांचे आव्हान
9.28 PM : बंगळुरुला सातवा धक्का; टीम साऊथी बाद
- मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने टीम साऊथी 19व्या षटकात बाद करत बंगळुरुला सातवा धक्का दिला.
9.23 PM : बंगळुरुला सहावा धक्का; वॉशिंग्टन सुंदर बाद
- अठराव्या षटकात हार्दिक पंड्याने तीन बळी मिळवले. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंड्याने वॉशिंग्टन सुंदरला बाद करत बंगळुरुला सहावा धक्का दिला.
9.20 PM : विराट कोहली OUT; बंगळुरुला मोठा धक्का
- अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने विराट कोहलीला बाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. कोहलीने 26 चेंडूंत 2 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 32 धावा केल्या.
9.19 PM : बंगळुरुला चौथा धक्का; मनदीप सिंग बाद
- हार्दिक पंड्याने अठराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मनदीप सिंगला बाद करत बंगळुरुला चौथा धक्का दिला.
9.11 PM : बंगळुरु पंधरा षटकांत 3 बाद 123
9.02 PM : ब्रेंडन मॅक्युलम बाद; बंगळुरुला तिसरा धक्का
- हार्दिक पंड्याने थेट फेकीने मॅक्युलमला धावचीत करत बंगळुरुला तिसरा धक्का दिला. मॅक्युलमने 25 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 37 धावा केल्या.
8.47 PM : बंगळुरु दहा षटकांत 2 बाद 82
8.37 PM : बंगळुरुला दुसरा धक्का; मनन व्होरा बाद
- मुंबईच्या मयांक मार्कंडेने मनन व्होराला बाद करत बंगळुरुला दुसरा धक्का दिला. व्होराने 31 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 45 धावा केल्या.
8.22 PM : बंगळुरुला पहिला धक्का; डी'कॉक बाद
- पाचव्या षटकात मिचेल मॅक्लेघनने डी'कॉकला बाद करत बंगळुरुला पहिला धक्का दिला. डी'कॉकने सात धावा केल्या.
8.15 PM : मनन व्होरा तळपला, चौथ्या षटकात फटकावल्या 22 धावा
- चौथ्या षटकात मनन व्होराने प्रत्येकी दोन चौकार आणि षटकार लगावत 22 धावा लूटल्या.
7.58 PM : बंगळुरुच्या मनन व्होराचा दुसऱ्याच चेंडूवर षटकार
- मनन व्होराने जेपी ड्युमिनीच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार लगावत बंगळुरुला झोकात सुरुवात करुन दिली.
7.45 PM : बंगळुरुचा एबी डी'व्हिलियर्स दुसऱ्या सामन्यालाही मुकणार
7.25 PM : मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली
अनुष्काला वाढदिवसाची विजयी भेट कोहली देणार का... आज मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना
बंगळुरु : अनुष्का जेव्हा सामना बघायला जाते तेव्हा विराटचा संघ पराभूत होतो... असा एक समज आहे. आज अनुष्काचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज अनुष्काला वाढदिवसाची विजयी भेट कोहली देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना आहे. मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचा मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांना फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आता तिसरा सामना कोणता संघ जिंकणार, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.
दोन्ही संघ