RCB vs RR Latest News : राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात आज सामना अबु धाबी येथे रंगत आहे. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर महिपाल लोम्रोर याने सावध खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. युजवेंद्र चहलनं ( Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राहुल टेवाटिया आणि जोफ्रा आर्चर यांनी अखेरच्या षटकांत हल्लाबोल केला. RCB vs RR Latest News & Live Score
देवदत्त पडीक्कलचा अफलातून झेल; जोस बटलरलाही बसला नाही विश्वास, Video
राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. पण, RRचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले. रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या महिपाल लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पराग ( 16) माघारी परतला. लोम्रोरही 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करून बाद झाला. राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. टेवाटिया आणि आर्चर यांनी 21 चेंडूंत नाबा 40 धावा चोपल्या. टेवाटियानं 3 षटकार खेचून नाबाद 24,तर आर्चरनं 16 धावा केल्या.
युजवेंद्र चहलचा भारी रिटर्न झेल, पण OUT or NOT OUT?; Video पाहून ठरवा तुम्हीच
धावांचा पाठलाग करताना RCBचा सलामीवीर आरोन फिंच लगेल माघारी परतला, परंतु युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. देवदत्तनं अर्धशतक झळकावताना एक वेगळा पराक्रम नावावर केला. IPLमधील पहिल्या चार सामन्यांत एकाही फलंदाजाला तीन वेळा 50+ धावा करता आलेल्या नाहीत. पडीक्कलने ती कामगिरी करून दाखवली. त्यानं चार सामन्यांत तीन अर्धशतकं झळकावली. त्याच्याशिवाय 10 फलंदाजांना पहिल्या चार सामन्यांत दोन वेळाच 50+ खेळ करता आला आहे.
पडीक्कलची आतापर्यंतची कामगिरी56 ( 42 चेंडू) वि. सनरायझर्स हैदराबाद, दुबई1 ( 2 चेंडू) वि. किंग्स इलेव्हन पंजाब, दुबई54 ( 40 चेंडू) वि. मुंबई इंडियन्स, दुबई53 ( 34 चेंडू)* वि. राजस्थान रॉयल्स, अबु धाबी