RCB vs RR Latest News : विराट-देवदत्तची जोडी जमली, RCBनं विजयाला सहज गवसणी घातली

RCB vs RR Latest News & Live Score: राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यात RCBने बाजी मारली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 3, 2020 07:24 PM2020-10-03T19:24:50+5:302020-10-03T19:31:28+5:30

whatsapp join usJoin us
RCB vs RR Latest News : Royal Challengers Bangalore won by 8 wickets | RCB vs RR Latest News : विराट-देवदत्तची जोडी जमली, RCBनं विजयाला सहज गवसणी घातली

RCB vs RR Latest News : विराट-देवदत्तची जोडी जमली, RCBनं विजयाला सहज गवसणी घातली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RCB vs RR Latest News & Live Score:  राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यातल्या सामन्यात RCBने बाजी मारली. Indian Premier League ( IPL 2020) मधील दिवसा खेळवला जाणारा हा पहिलाच सामना आहे. राजस्थान रॉयल्सचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर महिपाल लोम्रोर याने सावध खेळ करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. युजवेंद्र चहलनं (  Yuzvendra Chahal) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. निराशाजनक कामगिरीनंतर RCBचा डाव देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) आणि विराट कोहली  (Virat Kohli) यांनी सावरला. RCBनं हा सामना सहज जिंकला. 


राजस्थान रॉयल्सचा ( RR) कर्णधार स्टीव्ह स्मिथ यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जोस बटलर ( Jos Buttler) आणि स्मिथ यांनी RRच्या डावाची सावध सुरुवात केली. पण, RRचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले. रियान पराग आणि पहिलाच सामना खेळणाऱ्या महिपाल लोम्रोर या युवा खेळाडूंनी सावध खेळ करताना RRला शंभरी पार करून दिली. पराग ( 16) माघारी परतला. लोम्रोरही 1 चौकार व 3 षटकारांसह 39 चेंडूंत 47 धावा करून बाद झाला.  राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) आणि जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यांनी अखेरच्य षटकात हल्लाबोल चढवला अन् RRनं 6 बाद 154 धावा केल्या. टेवाटिया आणि आर्चर यांनी 21 चेंडूंत नाबा 40 धावा चोपल्या. टेवाटियानं 3 षटकार खेचून नाबाद 24,तर आर्चरनं 16 धावा केल्या.  

धावांचा पाठलाग करताना RCBचा सलामीवीर आरोन फिंच लगेल माघारी परतला, परंतु युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी दमदार खेळ केला. देवदत्तानं 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर विराटनेही 41 चेंडूंत 50 धावा केल्या. IPLमधील 8 डावांनंतर विराटनं अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे IPLमधील 37वे अर्धशतक ठरले. विराट-देवदत्तची 99 धावांची भागीदारी जोफ्रा आर्चरने तोडली. देवदत्त 63 धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराटनं अखेरपर्यंत खिंड लढवून RCBचा विजय पक्का केला. RCBनं 8 विकेट राखून हा सामना जिंकला. विराट 53 चेंडूंवर 72 धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: RCB vs RR Latest News : Royal Challengers Bangalore won by 8 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.