RCB vs RR Live Match । बंगळुरू : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. दोन्हीही संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ ८ गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर आरसीबीचा (RCB) संघ सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. मागील सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) आरसीबीच्या संघाचे नेतृत्व केले होते. पंजाब किंग्जला नमवून आरसीबीने शानदार विजय मिळवला होता. आजच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यजमान विराट कोहलीचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसेल. आरसीबीचा संघ गो ग्रीनचा संदेश देत मैदानात उतरला आहे.
दरम्या, दोन्ही संघातील आघाडीचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर चांगल्या लयनुसार खेळत आहे, तर कर्णधार संजू सॅमसन स्फोटक खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडत आहे. दुसरीकडे आरसीबीचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांची जोडी प्रत्येक सामन्यात प्रभावी कामगिरी करत आहे.
RCB नव्या जर्सीत
आरसीबीचा संघ दरवर्षी एकातरी सामन्यात ग्रीन जर्सी घालतो कारण तो त्यांच्या 'Go Green' चळवळीचा भाग आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपण करणे, याचा प्रसार करण्यासाठी विराट कोहलीच्या संघाचा हा प्रयत्न आहे. जगाला सध्या ग्लोबल वॉर्मिंगची समस्या भेडसावत आहे. आगामी काळात परिस्थिती अजून बिघडण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुनर्वापराचे महत्त्व पटवून देण्याचे काम RCBचा संघ करत आहे. प्रदुषण रोखण्यासाठी Reduce, Recycle आणि Reuse हे तीन महत्त्वाचे मुद्दे RCB त्यांच्या चळवळीतून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. RCBची ही ग्रीन जर्सी ही प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे २०११ पासून आरसीबीचा संघ हा उपक्रम राबवत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: RCB vs RR Live Match Rajasthan Royals captain Sanju Samson has won the toss and decided to bowl first
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.