Join us  

RCB vs SRH, IPL 2018 LIVE UPDATE : हुश्श... बंगळुरु अखेर जिंकली; हैदराबादवर विजयासह पाचव्या स्थानी

हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन आणि मनीष पांडे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी रचत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण 20व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विल्यम्सन बाद झाला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 7:43 PM

Open in App
ठळक मुद्देअखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक लढतीत अखेर बंगळुरुने 14 धावांनी बाजी मारली. 

हुश्श... बंगळुरु अखेर जिंकली; हैदराबादवर विजयासह पाचव्या स्थानी

बंगळुरु : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक लढतीत अखेर बंगळुरुने 14 धावांनी बाजी मारली. डी'व्हिलियर्स आणि मोईन अली यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 218 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करतना हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन आणि मनीष पांडे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी रचत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण 20व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विल्यम्सन बाद झाला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. विल्यम्सनने 42 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 81 धावांची खेळी साकारली. पांडेनेही अखेरपर्यंत किल्ला लढवत 38 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 62 धावा केल्या. 

सामन्याची क्षणचित्रे पाहा...

 

 

11.36 PM : रोमहर्षक लढतीत बंगळुरुचा हैदराबादवर 14 धावांनी विजय

11.33 PM : हैदराबादला विजयासाठी 4 चेंडूंत 20 धावांची गरज

11.32 PM :  हैदराबादला विजयासाठी 5 चेंडूंत 20 धावांची गरज

11.30 PM : केन विल्यम्सन बाद; हैदराबादला मोठा धक्का

- अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर केन बाद झाला, हा हैदराबादसाठी मोठा धक्का होता. विल्यम्सनने 42 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 81 धावांची खेळी साकारली.

11.29 PM : हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूंत 20 धावांची गरज

11.26 PM : मनीष पांडेचे 30 चेडूंत अर्धशतक

11.22 PM :  हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूंत 35 धावांची गरज

11.15 PM : टीम साऊथीचा भेदक मारा, 17 व्या षटकात दिल्या सात धावा

11.08 PM :  हैदराबादला विजयासाठी 24 चेंडूंत 55 धावांची गरज

 - केन विल्यम्सनने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे हैदराबादने 16 षटकांत 164 धआवा केल्या.

10.56 PM : केन विल्यम्सनचे 28 चेंडूंत अर्धशतक

- हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने 28 चेंडूंत अर्धशतक साजरे करत संघाचे आव्हान जीवंत ठेवले.

सुपरमॅन... डी'व्हिलियर्सने अॅलेक्स हेल्सचा अप्रतिम झेल टीपला... पाहा हा व्हीडीओ...

 

22.36 PM : डी'व्हिलियर्सचा अफलातून झेल; अॅलेक्स हेल्स OUT

-  डी'व्हिलियर्सने सीमारेषेवर अफलातून झेल टीपत अॅलेक्स हेल्सला तंबूचा रस्ता दाखवला. हेल्सने 24 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 37 धावा केल्या.

10.21 PM : शिखर धवन OUT; हैदराबादला पहिला धक्का

- युजवेंद्र चहलने स्वत:च्याच गोलंदाजीवर धवनचा झेल घेत त्याला माघारी धाडले. धवनला 15 चेंडूंत 18 धावा करता आल्या.

रशिद खानने टीपलेला अप्रतिम झेल... पाहा हा व्हीडीओ

 

10.11 PM : हेल्सची तुफानी फलंदाजी; हैदराबाद तीन षटकांत बिनबाद 28

- हैदराबादचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सने धडाकेबाज फलंदाजी करत हैदराबादला तीन षटकांत 28 धावा करून दिल्या.

डी'व्हिलियर्स आणि मोईन अली यांची तुफानी फटकेबाजी; बंगळुरुचा 218 धावांचा डोंगर

बंगळुरु : डी'व्हिलियर्स आणि मोईन अली यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्रथम फलंदाजी करताना 218 धावांचा डोंगर उभारता आला. बंगळुरुचे दोन्ही सलामीवीर पार्थिव पटेल आणि विराट कोहली हे स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर डी'व्हिलियर्स आणि मोईन अली यांनी संघाची धुरा समर्थपणे वाहिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी रचत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ए बी डी'व्हिलियर्सने 39 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 69 धावा केल्या, तर मोईनने 34 चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 65 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या रशिद खानने एकाच षटकात या दोघांनाही बाद करत बंगळुरुला दुहेरी धक्के दिले. हे दोघे बाद झाल्यावर कॉलिन डी' ग्रँडहोमने 17 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 40 धावा केल्या आणि संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. रशिद खानने भेदक मारा करत 27 धावांत 3 बळी मिळवले.

9.42 PM : बंगळुरुचे हैदराबादपुढे 219 धावांचे आव्हान

9.40 PM : रशिद खानचा अप्रतिम झेल; कॉलिन डी' ग्रँडहोम बाद

- रशिद खानने सीमारेषेवर अप्रतिम झेल पकडत कॉलिन डी' ग्रँडहोमला तंबूत धाडले. कॉलिन डी' ग्रँडहोमने 17 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 40 धावा केल्या.

9.34 PM : सर्फराझ खानच्या चौकाराने बंगळुरुच्या दोनशे धावा पूर्ण

- सर्फराझ खानने 19व्या षटकात चौकार लगावत बंगळुरुच्या दोनशे धावा पूर्ण केल्या.

9.27 PM :  बंगळुरुला पाचवा धक्का; मनदीप सिंग बाद

- सिद्धार्थ कौलने मनदीप सिंगला बाद करत बंगळुरुला पाचवा धक्का दिला. मनदीपला चार धावा करता आल्या.

ए बी डी'व्हिलियर्सच्या अर्धशतकानंतर कोहली कसा झाला खूष... पाहा हा व्हीडीओ

 

9.12 PM : ए बी डी'व्हिलियर्सनंतर मोईन अली पण बाद

- पंधराव्या षटकात रशिद खानने मोईन अलीला पण तंबूचा रस्ता दाखवत बंगळुरुला एकाच षटकात दोन धक्के दिले. मोईनने 34 चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 65 धावा केल्या.

9.09 PM :  ए बी डी'व्हिलियर्स OUT; बंगळुरुला मोठा धक्का

- रशिद खानने ए बी डी'व्हिलियर्सला बाद करत बंगळुरुला मोठा धक्का दिला. ए बी डी'व्हिलियर्सने 39 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 69 धावा केल्या.

8.59 PM :  ए बी डी'व्हिलियर्सचा मैदानाबाहेर गगनभेदी षटकार

डी'व्हिलियर्सने बासिल थम्पीच्या तेराव्या षटकात गगनभेदी षटकार लगावला. हा षटकार थेट स्टेडियमबाहेर गेला.

8.58 PM : मोईन अलीचे 25 चेंडूंत अर्धशतक

- डी'व्हिलियर्सपेक्षा आक्रमक फलंदाजी करत मोईन अलीने फक्त 25 चेंडूंत अर्धशतक झळकावले. 

8.54 PM : चौकारासह ए बी डी'व्हिलियर्सचे 32 चेंडूत अर्धशतक

- कोहली बाद झाल्यावरही ए बी डी'व्हिलियर्सने बंगळुरुच्या संघाची धुरा सांभाळली. डी'व्हिलियर्सने 32 चेंडूंत अर्धशतक झळकावत संघाचा धावफलक चांगलाच वाढवला.

कोहली कसा त्रिफळाचीत झाला ते पाहा...

 

8. 30 PM : बंगळुरु आठ षटकांत 2 बाद 70

8.19 PM : विराट कोहली BOLD; बंगळुरुला मोठा धक्का

- हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने टाकलेला चेंडू कोहलीला समजला नाही आणि त्याला त्रिफळाचीत होऊन तंबूत परतावे लागले. कोहलीने 11 चेंडूंत 12 धावा केल्या.

8.03 PM : पार्थिव पटेल पहिल्याच षटकात बाद

- पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर संदीप शर्माने पार्थिव पटेलला बाद केला. पटेलला फक्त एकाच धावावर समाधान मानावे लागले.

8.00 PM : पहिल्याच चेंडूवर पार्थिव पटेलला जीवदान

- सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बंगळुरुचा सलामीवीर पार्थिव पटेलला जीवदान मिळाले. पटेलला त्यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

7.35 PM : हैदराबादने भुवनेश्वर कुमारला वगळले; बासिल थम्पीला संघात स्थान

7.30 PM : हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली; बंगळुरुची प्रथम फलंदाजी... पाहा हा व्हीडीओ

 

मोठ्या विजयासह बंगळुरुला चौथ्या स्थानाची संधी; आज हैदराबादशी सामना

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलचा प्रत्येक सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. गुरुवारी बंगळुरुची गाठ अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी पडणार आहे. या सामन्यात त्यांनी जर हैदराबादला मोठ्या फरकाने पराभूत केले तर त्यांना चौथ्या स्थानावर जाण्याचा नामी संधी असेल. पण बंगळुरुला मोठ्या फरकाने हा सामना जिंकता आला नाही तरीदेखील विजयासह ते पाचव्या स्थानावर पोहोचू शकतात. त्यामुळे विराट सेना हैदराबादला किती मोठ्या फरकाने पराभूत करते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. पण या सामन्यात जर बंगळुरुचा संघ पराभूत झाला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.

दोन्ही संघ

 

 

सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी कसा केला सराव केला पाहा...

 

बंगळुरु आणि हैदराबाद या दोन्ही संघांचे स्टेडियममध्ये आगमन... पाहा व्हीडीओ

 

टॅग्स :आयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसनरायझर्स हैदराबादविराट कोहली