विराट कोहली ( Virat Kohli) च्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या ( Royal Challengers Bangalore) जेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या मोहिमेला आजपासून प्रारंभ झाला. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ( Sunrisers Hyderabad)चा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी दमदार सुरूवात केली. पदार्पणातच RCBच्या देवदत्तनं पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करून SRHच्या गोलंदाजांना हैराण करत अर्धशतक पूर्ण केले. देवदत्त-फिंच यांनी रचलेल्या मजबूत पायावर Mr. 360 एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) ने धावांचा डोंगर उभा केला. ( RCB vs SRH Live Score & Updates )
देवदत्त पडीक्कलच्या फटकेबाजीनंतर 'Mr. 360'चं वादळ घोंगावलं; RCBनं SRHला झोडपलं
कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. मागील मोसमात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि यंदा मिळालेल्या संधीचं पहिल्याच सामन्यात सोनं करण्याच्या निर्धारानं Padikkal मैदानावर उतरला होता. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 47 धावांवर असताना त्यानं टोलावलेला चेंडू झेलण्याची संधी SRHच्या खेळाडूने दवडली आणि देवदत्तचे अर्धशतक पूर्ण झाले. त्याला फिंचची संयमी साथ मिळाल्यानं RCBनं पहिल्या दहा षटकांत 86 धावा केल्या. 11व्या षटकात देवदत्तला पुन्हा जीवदान मिळाले. पण, त्याच षटकात विजय शंकरनं त्याचा त्रिफळाचीत केले. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांसह 56 धावा केल्या. पुढच्याच षटकात फिंचही बाद झाला. अभिषेक शर्मानं ( Abhishek sharma) ने त्याला 29 धावांवर पायचीत केले.( RCB vs SRH Live Score & Updates )
देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम
सहा महिन्यांनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. AB de Villiers सोबत त्यानं चांगली भागीदारीचे स्वप्न दाखवलं, परंतु T Natarajanने त्याला बाद केले. विराटला 14 धावाच करता आल्या. त्यानंतर एबीनं दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा कुटल्या.
IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!
...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी
एबीनं दोन षटकार खेचून RCBकडून 200 षटकार मारण्याचा विक्रम नावावर केला. असा पराक्रम करणारा तो RCBचा दुसरा फलंदाज ठरला.
ख्रिस गेल ( 239 षटकार), विराट कोहली ( 190) आणि रॉस टेलर ( 31) हे अव्वल चार फलंदाज आहेत.
IPL मधील सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
ख्रिस गेल - 326
एबी डिव्हिलियर्स - 214
महेंद्रसिंग धोनी - 209
रोहित शर्मा - 194
सुरेश रैना - 194
विराट कोहली - 190
डेव्हिड वॉर्नर - 181
शेन वॉटसन - 177
किरॉन पोलार्ड - 177
युसूफ पठाण - 158
Web Title: RCB vs SRH Latest News : AB De Villiers becomes the second player to smash 200 sixes for RCB in IPL history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.