ठळक मुद्देयुजवेंद्र चहलनं एका षटकात बेअरस्टो व विजय शंकरला केलं बादहैदराबाद संघानं 32 धावांत 8 फलंदाज गमावले
रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना चुरशीचा झाला. RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी दमदार सुरूवात केली. देवदत्त-फिंच यांनी रचलेल्या मजबूत पायावर Mr. 360 एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) ने धावांचा डोंगर उभा केला. पण, जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते, परंतु युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला. चहलनं ( Chahal) तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत RCBला सामन्यात कमबॅक करून दिले. RCBनं त्यानंतर सामना सहज जिंकला. ( RCB vs SRH Live Score & Updates )
कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. मागील मोसमात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि यंदा मिळालेल्या संधीचं पहिल्याच सामन्यात सोनं करण्याच्या निर्धारानं Padikkal मैदानावर उतरला होता. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 47 धावांवर असताना त्यानं टोलावलेला चेंडू झेलण्याची संधी SRHच्या खेळाडूने दवडली आणि देवदत्तचे अर्धशतक पूर्ण झाले. त्याला फिंचची संयमी साथ मिळाल्यानं RCBनं पहिल्या दहा षटकांत 86 धावा केल्या. 11व्या षटकात देवदत्तला पुन्हा जीवदान मिळाले. पण, त्याच षटकात विजय शंकरनं त्याचा त्रिफळाचीत केले. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांसह 56 धावा केल्या. पुढच्याच षटकात फिंचही बाद झाला. अभिषेक शर्मानं ( Abhishek sharma) ने त्याला 29 धावांवर पायचीत केले.
सहा महिन्यांनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. AB de Villiers सोबत त्यानं चांगली भागीदारीचे स्वप्न दाखवलं, परंतु T Natarajanने त्याला बाद केले. विराटला 14 धावाच करता आल्या. त्यानंतर एबीनं दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा कुटल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर ( David Warner) कॉन्फिडन्ट वाटला. त्यानं डेल स्टेनच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकारही खेचला. वॉर्नर हा सामना एकहाती घेऊन जाईल असेच वाटत होते, परंतु दुर्दैवानं त्याची विकेट पडली. उमेश यादवनं टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने स्ट्रेट फटका मारला. यादवनं तो झेलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताला लागून चेंडू उलट दिशेच्या यष्टींवर आदळला आणि वॉर्नरला माघारी जावं लागलं.
पाहा नेमकं काय घडलं.
पण, बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी SRHचा डाव सावरला. या दोघांनी RCBच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यात बेअरस्टोला RCBच्या फिंचनं जीवदान दिले. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युझवेंद्र चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. दोन वेळा जीवदान मिळालेल्या बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. चहलला हॅटट्रिकची संधी होती, परंतु अभिषेक शर्मानं एक धाव घेत त्याला यश मिळवू दिले नाही. युझवेंद्रनं 4 षटकात 18 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या.
पुढच्या षटकात शिवम दुबे ( Shivam Dube) SRHच्या दोन फलंदाजांना बाद केले. प्रियांक गर्गला त्रिफळाचीत केल्यानंतर अभिषेक वर्मा व रशीद खान यांच्यात जोरदार टक्कर झाली. त्यात अभिषेक धावबाद झाला. त्यानंतर नवदीन सैनीनं भेदक मारा करताना RCBचा विजय पक्का केला. सैनीनं एकाच षटकात भुवनेश्वर कुमार व रशीद खान यांचा त्रिफळा उडवला. इथे SRHचा पराभव निश्चित झाला होता. 3 बाद 121 वरून SRHचा डाव सर्वबाद 153 धावांवर गडगडला. RCBनं 10 धावांनी सामना जिंकला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
देवदत्त पडीक्कलच्या फटकेबाजीनंतर 'Mr. 360'चं वादळ घोंगावलं; RCBनं SRHला झोडपलं
देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम
IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!
...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी
एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज
Web Title: RCB vs SRH Latest News : Royal Challengers won by 10 runs, Yuzvendra Chahal turn the match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.