रॉयल चॅलेजर्स बंगळुरु ( Royal Challengers Bangalore) आणि सनरायजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामना चुरशीचा झाला. RCBकडून आरोन फिंच ( Aaron Finch) आणि देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) यांनी दमदार सुरूवात केली. देवदत्त-फिंच यांनी रचलेल्या मजबूत पायावर Mr. 360 एबी डिव्हिलियर्स ( AB de Villiers) ने धावांचा डोंगर उभा केला. पण, जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow ) आणि मनीष पांडे ( Manish Pandey) यांनी RCBच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. SRH हा सामना जिंकतील असे सहज वाटत होते, परंतु युझवेंद्र चहलच्या ( Yuzvendra Chahal) एका षटकानं सामना फिरवला. चहलनं ( Chahal) तीन महत्त्वाच्या विकेट्स घेत RCBला सामन्यात कमबॅक करून दिले. RCBनं त्यानंतर सामना सहज जिंकला. ( RCB vs SRH Live Score & Updates )
कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं SRHच्या गोलंदाजांची धुलाई केली. मागील मोसमात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती आणि यंदा मिळालेल्या संधीचं पहिल्याच सामन्यात सोनं करण्याच्या निर्धारानं Padikkal मैदानावर उतरला होता. त्यानं पदार्पणाच्या सामन्यात 36 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. 47 धावांवर असताना त्यानं टोलावलेला चेंडू झेलण्याची संधी SRHच्या खेळाडूने दवडली आणि देवदत्तचे अर्धशतक पूर्ण झाले. त्याला फिंचची संयमी साथ मिळाल्यानं RCBनं पहिल्या दहा षटकांत 86 धावा केल्या. 11व्या षटकात देवदत्तला पुन्हा जीवदान मिळाले. पण, त्याच षटकात विजय शंकरनं त्याचा त्रिफळाचीत केले. देवदत्तनं 42 चेंडूंत 8 चौकारांसह 56 धावा केल्या. पुढच्याच षटकात फिंचही बाद झाला. अभिषेक शर्मानं ( Abhishek sharma) ने त्याला 29 धावांवर पायचीत केले.
सहा महिन्यांनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) मोठ्या खेळीची अपेक्षा होती. AB de Villiers सोबत त्यानं चांगली भागीदारीचे स्वप्न दाखवलं, परंतु T Natarajanने त्याला बाद केले. विराटला 14 धावाच करता आल्या. त्यानंतर एबीनं दमदार खेळ करताना 30 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 51 धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर RCBनं 5 बाद 163 धावा कुटल्या.
पाहा नेमकं काय घडलं.
पण, बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी SRHचा डाव सावरला. या दोघांनी RCBच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यात बेअरस्टोला RCBच्या फिंचनं जीवदान दिले. बेअरस्टो आणि पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावा जोडल्या. युझवेंद्र चहलनं ही जोडी तोडताना पांडेला ( 34) धावांवर बाद केले. दोन वेळा जीवदान मिळालेल्या बेअरस्टो 16 व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेअरस्टोने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 61 धावा केल्या. पुढच्याच चेंडूवर चहलनं SRHच्या विजय शंकरला त्रिफळाचीत केले. चहलला हॅटट्रिकची संधी होती, परंतु अभिषेक शर्मानं एक धाव घेत त्याला यश मिळवू दिले नाही. युझवेंद्रनं 4 षटकात 18 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
देवदत्त पडीक्कलच्या फटकेबाजीनंतर 'Mr. 360'चं वादळ घोंगावलं; RCBनं SRHला झोडपलं
देवदत्त पडीक्कलची पदार्पणातील अर्धशतकाची परंपरा कायम, मोडला AB de villiersचा विक्रम
IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!
...मग Technology काय कामाची? अम्पायरच्या चुकीवर प्रिती झिंटा खवळली, BCCIकडे केली मागणी
एबी डिव्हिलियर्सनं केला पराक्रम, ठरला RCBकडून दुसरा यशस्वी फलंदाज