Join us  

वेगवान सुरुवातीनंतरही आरसीबीच्या धावगतीला ब्रेक

हैदराबादचा नियंत्रित मारा : देवदत्त पडिक्कलचे पदार्पणात अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 5:36 AM

Open in App

दुबई : गेल्या सत्रातील खराब कामगिरीमुळे आलेली मरगळ झटकून नव्या निर्धाराने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २० षटकांत ५ बाद १६३ अशी मजल मारली. आयपीएल पदार्पण करणारा देवदत्त पडिक्कल व एबी डीव्हिलियर्स यांचे आक्रमक अर्धशतक आरसीबीच्या डावात महत्त्वाचे ठरले.

आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या देवदत्तने अपेक्षित खेळी करताना हैदराबादच्या भक्कम गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतल. भुवनेश्वर कुमारच्या स्विंग माºयाचा अपवाद वगळता सर्वच गोलंदाज देवदत्तपुढे हतबल भासले. त्याचवेळी दुसरीकडे, आॅस्टेÑलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच मात्र चाचपडताना दिसला.

देवदत्तने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावत आपली क्षमता सिद्ध केली. त्याने ४२ चेंडूंत ५६ धावा काढत हैदराबादच्या गोलंदाजांना घाम फोडला. अ‍ॅरोन फिंचने स्ट्राईक रेट शंभरच्या वर ठेवली, मात्र तो चाचपडताना दिसला. यादरम्यान देवदत्तला दोनवेळा जीवदानही मिळाले. देवदत्त आणि फिंच पाठोपाठच्या चेंडूंवर बाद झाल्यानंतर आरसीबीच्या धावगतीला ब्रेक लागला.

सहा महिन्यांनी मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीवर सर्वांचे लक्ष होते. मात्र तो अपयशी ठरला. दोन स्थिरावलेले फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या विराट-डीव्हिलियर्स या अनुभवी जोडीने खेळपट्टीवर स्थिरावण्यास भर देताना एकेरी-दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवला. आक्रमणाच्या नादात कोहली बाद झाल्यानंतर डीव्हिलियर्सने सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली. त्याने ३० चेंडूंत ५१ धावा काढत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली.मजबूत गोलंदाजी असलेल्या हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, राशिद खान अभिषेक शर्मा आणि टी. नटराजन यांनी अचूक मारा करत आरसीबीला फटकेबाजीपासून दूर ठेवले.

मार्शला झाली दुखापत..डावातील पाचवे षटक टाकणाºया मिचेल मार्शला गोलंदाजी करताना झालेल्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. पाचव्या षटकातील चौथा चेंडू टाकताना मार्शचा पाय मुरगळला आणि त्याला वेदनेमुळे मैदान सोडावे लागले. यानंतर त्याच्या षटकातील उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले. मार्शची दुखापत हैदराबादसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :IPL 2020