टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) सध्या संकटाचा सामना करत आहे. त्याचे आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. आईवर घरीच उपचार सुरू होते, तर वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. मागील आठवड्यात चहलची पत्नी धनश्री वर्मा ( Dhanashree Verma) हिनं ही माहिती पोस्ट केली होती. पण, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अपडेट्स आलेले नाही. अशात धनश्रीने मंगळवारी इस्टाग्रामवर डान्सिंग व्हिडीओ पोस्ट केला. यात ती रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या ( RCB) जर्सीत सॅल्यूट करत डान्स करताना दिसत आहे. पण, सोशल मीडियावर ती ट्रोल झाली.
धनश्री वर्मानं She Make it Clap या गाण्यावर डान्स करतानाचा शॉर्ट व्हिडीओ पोस्ट केला. बऱ्याच दिवसानंतर तिनं सोशल मीडियावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. इंस्टाग्रामवरही धनश्रीचे पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत.
युजवेंद्र चहला आयपीएल 2021त फार कमाल दाखवता आली नाही. त्यानं 7 सामन्यांत केवळ 4 विकेट्स घेतल्या. भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात त्याची निवड झाली नसली तरी श्रीलंका दौऱ्यासाठीच्या संघात तो जाऊ शकतो. जुलै महिन्यात भारतीय संघ वन डे व ट्वेंटी-20 मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. पण, या दौऱ्यावर बीसीसीआय भारताची दुसरी फळी मैदानावर उतरवणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह हे स्टार खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत.
Web Title: RCB’s Yuzvendra Chahal’s wife Dhanashree Verma is back with new dancing moves; Watch viral video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.