T20 World Cup Ind Vs Eng : सेमीफायनलमध्ये आज भारतासमोर इंग्लंडचं आव्हान, कुणाचं पारडं जड? आकडेवारी 'या' संघाच्या बाजूने

T20 World Cup Ind Vs Eng : आज भारतीय संघाचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे. पाहा काय म्हणतेय आकडेवारी.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 09:26 AM2022-11-10T09:26:34+5:302022-11-10T09:27:31+5:30

whatsapp join usJoin us
recent records slightly favour team india ahead of clash against england in t20 world cup 2022 semi final ind vs pak know details | T20 World Cup Ind Vs Eng : सेमीफायनलमध्ये आज भारतासमोर इंग्लंडचं आव्हान, कुणाचं पारडं जड? आकडेवारी 'या' संघाच्या बाजूने

T20 World Cup Ind Vs Eng : सेमीफायनलमध्ये आज भारतासमोर इंग्लंडचं आव्हान, कुणाचं पारडं जड? आकडेवारी 'या' संघाच्या बाजूने

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup Ind Vs Eng : T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात आज गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी ॲडलेड ओव्हल येथे भारत आणि इंग्लंड एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारताने सुपर 12 मध्ये चार सामने जिंकले आणि गट 2 मध्ये अव्वल स्थान मिळवले. मात्र, पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी फलंदाज ठरले असून त्यांच्याकडून उपांत्य फेरीत संघाला मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे इंग्लंडसाठीही मोठा धोका असेल.

इंग्लंडबद्दल सांगायचे तर, शेवटच्या सुपर 12 सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला. इंग्लंडलाही आयर्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच बरोबर गेल्या दोन वर्षातील दोन्ही संघांचे रेकॉर्ड बघितले तर या बाबतीत टीम इंडिया इंग्लंडच्या संघापेक्षा सरस आहे. इंग्लंडविरुद्ध भारताचे फलंदाजच नव्हे तर गोलंदाजही यशस्वी कामगिरी करत आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विजयही टीम इंडियाला मिळाले आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्यात सर्वात जलद शतकाचा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे. त्याने जुलै 2022 मध्ये 48 चेंडूत शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने 117 धावा केल्या होत्या. उभय देशांमधील टी-20 क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. सूर्य कुमारचा स्ट्राइकरेट 195 पेक्षा जास्त आहे आणि हा दोन्ही देशांमधील सर्वोत्तम स्ट्राइकरेट आहे. मार्च 2021 मध्ये पदार्पण केल्यापासून तो इंग्लंडविरुद्ध 224 धावा करण्यात यशस्वी झाला आहे. या कालावधीतील एकाच फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

कोहलीचाही बोलबाला
इंग्लंडविरुद्धही विराट कोहलीचीही बॅट चांगलीच चालली आहे. मार्च 2021 पासून त्याने या संघाविरुद्ध 4 अर्धशतके झळकावली आहेत. याच मालिकेत विराटने इंग्लंडविरुद्ध 231 धावा केल्या. मात्र, दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. तर जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांनी सर्वाधिक भागीदारी (१३० धावा) केली आहे. इंग्लंडच्या संघाने सर्वाधिक (20) अतिरिक्त धावाही दिल्या आहेत. भारताने या संघाविरुद्ध गेल्या 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि दोन्ही मालिकाही भारताने जिंकल्या आहेत.

Web Title: recent records slightly favour team india ahead of clash against england in t20 world cup 2022 semi final ind vs pak know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.