Join us  

न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी, २२ चेंडूंत चोपल्या ११० धावा; मोडला बाबर आजमनचा वर्ल्ड रिकॉर्ड 

Michael Bracewell smashes record books : न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-२०लीग सुपर स्मॅश स्पर्धेत वर्ल्ड रिकॉर्डची नोंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 11:03 PM

Open in App

Michael Bracewell smashes record books : न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-२०लीग सुपर स्मॅश स्पर्धेत वर्ल्ड रिकॉर्डची नोंद झाली. वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाचा कर्णधार मायकल ब्रेसवेल ( Michael Bracewell) यानं फलंदाजीत चौकार - षटकारांची आतषबाजी केली. त्यानं त्याच्या खेळीत ११ चौकार व ११ षटकार खेचले आणि त्याच्या या खेळीच्या जोरावर फायरबर्ड्सनं विजय मिळवला. त्यांनी सेंट्रल डिस्ट्रीक्ट संघानं २० षटकांत २२८ धावांचे उभे केलेले लक्ष्य पार केले. प्रत्युत्तरात फायरबर्ड्सचे ५ खेळाडू ४३ धावांत माघारी परतले होते, परंतु ब्रेसवेल मैदानावर उतरला अन् सामन्याचे चित्र बदलले. फायरबर्ड्सनं २ विकेट्स राखून हा सामना जिंकला. ब्रेसवेलनं ४६ चेंडूंत शतक पूर्ण केले.

ब्रेसवेलनं त्याच्या खेळीत ११ चौकार व ११ षटकार खेचले, म्हणजे त्यनं २२ चेंडूंत ११० धावा चोपल्या. त्यापैकी ४४ धावा या चौकारानं तर ६६ धावा षटकारानं आल्या.    ब्रेसवेलनं नाबाद १४१ धावांची खेळी करताना बाबर आजमचा विक्रम मोडला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना कर्णधाराची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं २०२१मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२०त धावांचा पाठलाग करताना  १२२ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना ब्रेसवेलची १४१ धावांची खेळी ही तिसरी सर्वोत्तम खेळी ठरली.  यापूर्वी २०१४मध्ये ल्यूक राईटनं १५३ आणि २०१५मध्ये ख्रिस गेलनं नाबाद १५१ धावांची खेळी केली होती.  ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजाची ही तिसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. २००८मध्ये ब्रेंडन मॅक्युलमनं RCBविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्ससाठी  ७३ चेंडूंत १५८ धावा कुटल्या होत्या.  त्यानंतर २०१५मध्ये मॅक्युलमनं ट्वेंटी-२० ब्लास्टमध्ये ६४ चेंडूंत १५८ धावा केल्या होत्या.  

टॅग्स :न्यूझीलंडटी-20 क्रिकेटबाबर आजम
Open in App