बीसीसीआयनं शुक्रवारी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला २० सदस्यीय संघात स्थान न मिळाल्यानं सर्वांना आश्चर्य वाटलं. विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वीनं एकाच पर्वात ८००+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज आहे. शिवाय आयपीएल २०२१तही त्याची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळाली. तरीही त्याच्या नावाचा इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात विचार केला गेला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार निवड समितीनं पृथ्वी शॉ याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार पृथ्वी हा संथगतीनं रनिंग बिटवीन दी विकेट धावतो आणि त्यासाठी त्याचं वजन कारणीभूत आहे. शिवाय निवड समितीनं त्याला रिषभ पंतकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला. ''२१ वर्षाचा असूनही रिषभ खेळपट्टीवर खूप संथ धावतो. त्याला काही किलो वजन कमी करण्याची गरज आहे. Big News : इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या टीम इंडियातील गोलंदाजाला झाला कोरोना
ऑस्ट्रेलियात खेळताना सरावादरम्यान त्याच्या एकाग्रतेचा अभाव जाणवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर पृथ्वी पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याच्यासमोर रिषभ पंतच्या रुपानं ताजं उदाहरण आहे. पृथ्वीनं त्याच्याकडून काहीतरी शिकला, तर तोही त्याच्यासारखा होऊ शकतो,''असे बीसीसीआयनं सांगितलं. ''त्यानं सातत्यपूर्ण खेळ आणखी काही स्पर्धांमध्ये कायम राखायला हवा. एका स्पर्धेच्या कामगिरीवर त्याची भारतीय संघात निवड होते आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरतो. तो चांगला खेळाडू आहे आणि त्याला फारकाळ दुलर्क्षीत ठेवता येणार नाही,''असेही त्यांनी स्पष्ट केले. India Tour to England : २८ वर्षानंतर टीम इंडियात पारशी खेळाडू; जाणून घ्या कोण आहे अर्जान नगवस्वाला!
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पृथ्वीला भारतीय संघातून वगळण्यात आले. त्याला अॅडलेड कसोटीत अपयश आलं, तो दोन्ही डावांत शून्यावर बाद झाला होता. त्यानं सोडलेला झेल पाहून कर्णधार विराट कोहलीही संतापला होता. त्यानंतर 21 वर्षीय पृथ्वीनं विजय हजारे ट्रॉफीत 800+ धावा केल्या, तर आयपीएलमध्ये 308 धावा चोपल्या.
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव. लोकेश राहुल व वृद्धीमान सहा यांची निवड फिटनेस टेस्टनंतर; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जान नागवस्वाला