आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचा विजयरथ बांगलादेशने अडवला. सुपर ४ च्या अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादनेशने ६ धावांनी भारतावर विजय मिळवला. भारताच्या या पराभवाने सर्वात जास्त आनंद पाकिस्तानला झाला अन् फायदाही... भारताने या पराभवामुळे आयसीस वन डे रँकींगमध्ये नंबर १ होण्याची संधी गमावली आणि ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पुढे सरकला आणि त्यांना पुन्हा नंबर १ बनण्याची संधी मिळाली. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याचं विधान चर्चेत आले आहे. भारताच्या पराभवानं माझ्यासह पाकिस्तानला हायसं वाटलं असं, शोएब म्हणाला.
भारताने फक्त मॅच नाही, तर 'सुवर्णसंधी' गमावली; खूश झाले पाकिस्तानी!
पाकिस्तानला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या करो वा मरो सामन्यात त्यांना हातचा सामना गमवावा लागला. त्याआधी भारताने त्यांची बेक्कार धुलाई केली होतीच... भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध ५ प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानावर उतरला होता. बांगलादेशच्या ८ बाद २६५ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला २५९ धावाच करता आल्या. शुबमन गिलने १२१ धावांची खेळी केली होती आणि अक्षर पटेलने ४२ उपयुक्त धावा केल्या होत्या, परंतु बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. भारताचा हा लाजीरवाणा पराभव असल्याचे अख्तरने म्हटले.
"भारतीय संघ हरला. लाजिरवाणा पराभव. आम्ही जास्त टीका करू शकत नाही. बांगलादेशही या स्पर्धेत खेळायला आला आहे. लोक पाकिस्तानवर टीका करत होते, की त्यांचा पराभव झाला. श्रीलंका हा चांगला संघ आहे, सरासरी संघ नाही. बांगलादेशच्या बाबतीतही असेच आहे. ते सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. शेवटी, माझ्यासह पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी काहीसा दिलासा आहे की भारत हरला," असे अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.
ड्रेसिंग रुममध्ये फुल राडा! बाबर आजम भडकला, शाहीनची हुज्जत अन् रिझवानची मध्यस्थी
श्रीलंकेविरुद्ध विजय आवश्यक असलेल्या सामन्यात पाकिस्तानने हार मानली आणि आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अख्तरने टीका केली होती. रावळपिंडी एक्सप्रेसने म्हटले की बांगलादेश हा "सरासरी" संघ नाही आणि आशिया चषक विजेतेपदासाठी अंतिम फेरीत श्रीलंकेचा सामना करणार्या भारतासाठी हा वेक अप कॉल आहे. "फायनलपूर्वी भारतासाठी हा वेक अप कॉल आहे. काही सामने जिंकल्यानंतर तुम्ही संघांना हलक्यात घेऊ शकत नाही," असे अख्तर पुढे म्हणाले.