India vs England Test series ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि भारतीय संघाने सरावालाही सुरुवात केली आहे. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताने संघ जाहीर केला आहे आणि त्यात लोकेश राहुल, केएस भरत व ध्रुव जुरेल या तीन यष्टिरक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे यष्टिंमागे कोण दिसणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आणि KL Rahul हे नाव आघाडीवर आहे. पण, आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा व संघ व्यवस्थापनाचं टेंशन वाढवणारा खेळ KS Bharat याने करून दाखवला आहे.
कसोटी मालिकेपूर्वी भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सराव साना खेळवला गेला. इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी करून पहिला डाव ८ बाद ५५३ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात रजन पाटीदारच्या १५१ धावांच्या खेळीनंतरही भारताचा संपूर्ण संघ २२७ धावांत तंबूत परतला. इंग्लंड लायन्सने ६ बाद १६३ धावांवर दुसरा डाव घोषित करून भारत अ संघासमोर ४९० धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले आणि तिथेच केएस भरतने आपली क्षमता दाखवली. केएस भरतला आतापर्यंत ५ कसोटी सामन्यांत केवळ १२९ धावा करता आल्या होत्या.
कर्णधार अभिमन्यू इश्वरन शून्यावर माघारी परतला. रजत पाटीदार ४ धावाच करू शकला. पण, बी साई सुदर्शन ( ९७), सर्फराज खान ( ५५) आणि प्रसोद पॉल ( ४३) यांनी चांगला खेळ करताना भारत अ संघाचा डाव सावरला होता. पण, भारत अ संघाने २१९ धावांवर ५ विकेट्स गमावल्या अन् पराभवाचं वादळ घोंगावलं. केएस भरत व मानव सुतार यांनी सहाव्या विकेटसाठी २०७ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि भारत अ संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. ६४ धावांची गरज असताना सामना ड्रॉ करण्याचा निर्णय घेतला गेला. भरतने १६५ चेंडूंत १५ चौकारांच्या मदतीने नाबाद ११६ धावा केल्या, तर मानवने २५४ चेंडूंत नाबाद ८९ धावा केल्या.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
Web Title: Remarkable fight from India A on the final day while chasing 490. Manav Suthar ( 89) and KS Bharat ( 116) gritty sixth-wicket stand. IND A Match Drawn against ENGLAND LIONS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.