Join us  

आॅस्ट्रेलियाला लोळवणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदारांचे रिपोर्ट कार्ड

पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना थोडक्यात गमावल्याने आॅसीला व्हाइटवॉश देण्याची संधी हुकली खरी, पण भारतीयांनी राखलेले वर्चस्व जबरदस्त होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 3:44 AM

Open in App

मुंबई : श्रीलंकेला त्यांच्या घरात नमवल्यानंतर बलाढ्य टीम इंडियाने विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला आपल्या घरच्या मैदानावर ४-१ असे लोळवले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना थोडक्यात गमावल्याने आॅसीला व्हाइटवॉश देण्याची संधी हुकली खरी, पण भारतीयांनी राखलेले वर्चस्व जबरदस्त होते. चौथ्या सामन्याचा अपवाद वगळता आॅसीने फार कमी वेळा भारतापुढे आव्हान उभे केले.फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये भारताने चांगले प्रदर्शन केले. युवा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि अनुभवी रोहित शर्मा यांनी कांगारुंना नमविण्यात मोलाचे योगदान दिले. या मालिकेतही भारताने काही प्रयोग केले आणि त्यात यशही मिळाले.आता, आॅसीविरुद्धचा हाच धडाका आगामी टी-२० मालिकेतही कायम राखण्याचा निर्धार भारतीयांचा असेल. पण, त्याआधी जाणून घेऊन एकदिवसीय मालिकेतील भारतीय खेळाडूंचे ‘रिपोर्ट कार्ड’ ज्येष्ठ क्रिकेटतज्ज्ञ अयाझ मेमन यांनी खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांचे दहापैकी गुण देऊन विशेष विश्लेषण केले आहे.हार्दिक पांड्या - १० पैकी ८.५ गुणसहजपणे ‘मालिकावीर’चा किताब पटकावला. त्याने कपिलदेवप्रमाणेच उत्तुंग षटकार ठोकले. काही वेळा त्याने गोलंदाजीची धुरा सांभाळावी. त्याच्याकडे ‘गोल्डन आर्म’ आहेत. मालिकेत त्याने सातत्याने बळीही मिळवले. सध्या तो सर्वाधिक गुणवान युवा खेळाडू आहे.रोहित शर्मा - १० पैकी ८ गुणआॅस्ट्रेलियाविरुद्ध रोहित नेहमीच बहरतो. या मालिकेत त्याने सर्वाधिक धावा काढतानाच नागपूरसारख्या आव्हानात्मक खेळपट्टीवर त्याने शानदार शतक झळकावले. यावरूनच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचे सिद्ध होते.अजिंक्य रहाणे १० पैकी ८ गुणगेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा बाकावर बसवल्यानंतर अजिंक्यने चार तडाखेबंद अर्धशतके झळकावून संघव्यवस्थापनाला चांगलीच जाग आणून दिली. त्याने रोहितसह केलेल्या मोठ्या भागीदारी भारताच्या विजयात महत्त्वाच्या ठरल्या.महेंद्रसिंह धोनी १० पैकी ६.५ गुणधोनीने मालिकेत एकच धमाकेदार खेळी केली, पण ती खेळी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. प्रदीर्घ अनुभव आणि खंबीर मानसिकता या जोरावर तो संघासाठी नेहमी तारणहार असतो. यष्ट्यांच्या मागे त्याची कामगिरी नेहमीसारखी शानदार ठरली.कुलदीप यादव/ यजुवेंद्र चहल १० पैकी ८ गुणया दोघांनी अनुक्रमे ७ आणि ६ आॅसी फलंदाजांना आपली शिकार केले. दोघांनीही अप्रतिम फिरकी मारा करताना फलंदाजांना कायम संभ्रमात ठेवले. विशेषकरून मधल्या षटकांमध्ये दोघांनी चांगला मारा केला.केदार जाधव १० पैकी ७ गुणजेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडला, तेव्हा तेव्हा केदार जाधवने आपल्या अपारंपरिक आणि कल्पक फलंदाजीच्या जोरावर स्वत:लासिद्ध केले. संघाला अडचणीतून बाहेर काढत विजयी मार्ग तयार करण्यात केदार महत्त्वाचा ठरला.अक्षर पटेल १० पैकी ४.५ गुणकुलदीपच्या विपरित अक्षर डावखुरा आॅफस्पिनर. त्याने काही वेळा अचूक मारा केला खरा, पण अनेकदा फलंदाजांना मोकळेपणे खेळण्याचे स्वातंत्र्यही दिले. तसेच, केवळ एक सामना खेळण्याची त्याला संधी मिळाली. त्याला फलंदाजीतही छाप पाडता आली असती, पण एकूणच मैदानात त्याची उपस्थिती जाणवत होती.भुवनेश्वर कुमार/जसप्रीत बुमराह १० पैकी ८ गुणदोघांची शैली एकदम वेगळी. भुवी आपल्या पारंपरिक शैलीने स्विंग मारा करतो. त्याऊलट बुमराह आपल्या विचित्र शैलीने वेगवान आणि हळुवार चेंडूंचे मिश्रण करून मारा करतो. पण, दोघांनीही सारखेच यश मिळवले. नवीन चेंडूवर आॅसी संघाचे कायम सुरुवातीचे फलंदाज बाद केले. विशेष म्हणजे हे दोघेही डेथ ओव्हर्समध्ये खूप निर्णायक ठरले. जबरदस्त लय राखताना दोघांनीही कांगारूंना आक्रमकतेपासून दूर ठेवले.मोहम्मद शमी आणि उमेश यादव १० पैकी ५ गुणआतापर्यंत हे दोघेही भारताचे मुख्य गोलंदाज होते. पण, दोघांनाही केवळ एक सामना खेळण्यास मिळाला. बंगळुरुची सपाट खेळपट्टी दोघांसाठी फारशी फायदेशीर ठरली नाही. तरी उमेशने ४ बळी घेतले. दोघांनीही त्वेषाने मारा करून सिद्ध केले, की बाकावर बसूनही त्यांचा उत्साह काही कमी झालेला नाही.मनीष पांड्ये १० पैकी ५ गुणफलंदाजीतील क्रमवारीत नेहमी बदल झाल्याने मनीषची कामगिरी वरखाली झाली. पण, त्याला मिळालेल्या संधी आणखी चांगल्या प्रकारे साधाव्या लागतील. मनीषने सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षण करून सर्वांचे लक्ष वेधले.विराट कोहली १० पैकी ७ गुणकोहली त्याच्या लौकिकानुसार थोडा कमी पडला. त्याला चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. पण, त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची ठरली. त्याने खासकरून प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोलंदाजांचा चांगला वापर केला.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीहार्दिक पांड्या