Join us  

IPL 2021 : आयसीसीनं वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर करून BCCIची केली गोची; आयपीएल फायनलच्या तारखेत होणार बदल!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा मंगळवारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:02 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा मंगळवारी केली. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा चार वेगवेगळ्या स्टेडियमवर पार पडणार आहे. आयसीसीनं या तारखा जाहीर करून बीसीसीआयची गोची केली आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे आयपीएल 2021 स्थगित करावी लागली होती आणि उर्वरित 31 सामने यूएईत खेळवण्याची घोषणा बीसीसीआयनं केली होती.  त्यानुसार बीसीसीआयनं 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित केला होता. पण, आता बीसीसीआयला अंतिम सामन्याची तारीख बदलावी लागणार आहे.

WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि 14 सप्टेंबरला हा दौरा पूर्ण करून खेळाडू आयपीएल 2021साठी यूएईत दाखल होणार आहे. त्यानंतर लगेचच ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. अशात भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळणे अवघड आहे. त्यामुळे बीसीसीआयनं आयपीएल 2021चा अंतिम सामन्याची तारीख बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. Inside Sport नं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय 10 ऑक्टोबरला आयपीएल 2021ची फायनल खेळवण्याच्या तयारीत आहेत. जेणेकरून भारतीय खेळाडूंना दोन आठवड्यांची विश्रांती मिळेल. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. 

Photos : मास्क कुठेय?, कोरोना संकटात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पोहोचला रिषभ पंत!

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीला 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होईल, तर सुपर 12चे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्यामुळे भारतीय खेळाडूंना जास्तीत जास्त विश्रांती मिळावी, यासाठी बीसीसीआय आयपीएल 2021च्या वेळापत्रकात थोडा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट..

  • बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पपुआ न्यू गिनी यापैकी चार संघ सुपर १२ मध्ये प्रवेशासाठी खेळतील. 
  • आयसीसी क्रमवारीत अव्वल ८ क्रमांकावर असलेले संघ आधीच सुपर १२साठी पात्र ठरलेले आहेत. सुपर १२मध्ये ३० सामने होतील आणि २४ ऑक्टोबरला या सामन्यांची सुरुवात होईल. 
  •  सुपर १२ संघांची दोन गटांत विभागणी केली जाईल आणि त्यांचे सामने दुबई, अबु धाबी आणि शाहजाह या तीन मैदानावर होतील. त्यानंतर तीन प्ले ऑफ सामने, दोन सेमी फायनल व एक फायनल अशी स्पर्धा पुढे सरकेल.
टॅग्स :आयपीएल २०२१ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बीसीसीआयआयसीसी