इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातून सुरेश रैनानं माघार घेतल्यानं चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्काच बसला. रैनानं वैयक्तिक कारण सांगून दुबईतून मायदेशात परतला. CSK संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनीही रैनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्याला खडेबोल सुनावले होते. अर्थात त्यांनी त्या विधानावरून नंतर माघार घेत, रैना CSK कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगितले. त्यात रैनानं आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पुनरागमनाची शक्यता नाकारली नाही. पण, मायदेशात परतलेल्या रैनाची CSKच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हकालवट्टी करण्यात आलेली आहे.
IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले होते. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह हॉटेल रुमवरून वाद झाल्यानं रैना मायदेशी परतला अशीही चर्चा होती, परंतु आता रैनानं ती अफवा असल्याचे स्पष्ट केलं.
दरम्यान, InsideSportच्या वृत्तानुसार 33 वर्षीय रैनाची संघाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे आणि आता रैनानं संघ व्यवस्थापनाकडे माफी मागितली आहे. ''रैनानं दुबई सोडल्यानंतर त्याची संघाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून हकालपट्टी केली गेली. त्यानं आता संघाचे सीईओ, महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक फ्लेमिंग यांच्याशी चर्चा केली आणि पुनरागमनाबाबत विचारणआ केली,''असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता कर्णधार धोनीच्या हाती रैनाच्या भवितव्याचा निर्णय आहे.
रैनाच्या परतण्यावर निर्णय घेऊ शकत नाही - श्रीनिवासन
चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांच्यासाठी सुरेश रैना हा मुलाप्रमाणेच आहे. पण त्याच्या परतण्याबाबत ते निर्णय घेऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हा निर्णय कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि त्याच्या नेतृत्वातील संघ व्यवस्थापनच करेल.’
श्रीनिवासन यांनी सांगितले की, मी रैनाला माझ्या मुलाप्रमाणे समजतो. आयपीएलच्या फ्रांचायझींनी क्रिकेटच्या बाबतीत हस्तक्षेप केलेला नाही. मी देखील असेच करेल. रैनाचे संघात परतणे हे माझ्या हातात नाही. आम्ही संघ मालक आहोत. फ्रांचायझी मालक आहोत. पण खेळाडूंचे मालक नाही. संघ आमचा आहे. पण खेळाडू नाहीत. रैनाबाबत निर्णय धोनी आणि संघाचे सीईओ के.एस. विश्वनाथन घेतील.’ते पुढे म्हणाले की, ‘मी क्रिकेट कर्णधार नाही किंवा संघ व्यवस्थापनाला देखील कधीही सांगितले नाही की कुणाला घ्यावे. त्यामुळे मी त्यात हस्तक्षेप का करु?’
पुन्हा संघासोबत खेळू शकतो - रैना
रैना याने सांगितले की, त्याला पारिवारीक कारणांमुळे भारतात परत यावे लागले. सीएसके आणि त्याच्यात कोणतेही वाद नाहीत. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी पुढची चार ते पाच वर्षे क्रिकेट खेळण्यास इच्छुक आहे. तसेच सध्या विलगीकरणाच्या काळातही मी सराव करत आहे. त्यामुळे मी पुन्हा संघासोबत दिसु शकतो’