सिडनी : मर्यादित षटकांच्या मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात थांबण्याच्या आशा उंचावल्याच्या दोन दिवसानंतर भारताचा आक्रमक अष्टपैलू हार्दिक पांड्याने मायदेशी परतत असल्याचे मंगळवारी सांगितले. पाठीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या पांड्याने अद्याप नियमित गोलंदाजीला सुरुवात केलेली नाही, पण मर्यादित षटकांच्या मालिकेत शानदार कामगिरीनंतर त्याला कसोटी संघात त्याच्या निवडीबाबत विचार होऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली होती. रविवारी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर पांड्याने म्हटले होते की,‘संघव्यवस्थापनाने सांगितले तर मला ऑस्ट्रेलियात थांबण्यात कुठली अडचण नाही. त्यामुळे त्याच्या थांबण्याची आशा बळावली होती, पण दोन दिवसानंतर त्याने भारतात परतत असल्याचे सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या व अंतिम टी-२० आंतरारष्ट्रीय सामन्यानंतर बोलताना पांड्या म्हणाला,‘ मला वाटते की मायदेशी परतायला हवे. आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवायला हवा. मी चार महिन्यांपासून आपल्या बाळाला बघितले नाही. त्यामुळे मी कुटुंबासोबत वेळ घालविण्यास इच्छुक आहो.’
कसोटी मालिकेसाठी थांबण्याची इच्छा आहे का, याबाबत बोलताना तो म्हणाला,‘ते वेगळे क्रिकेट आहे. मला कुठली अडचण नाही, पण शेवटी निर्णय संघव्यवस्थापनाला घ्यायचा आहे.
Web Title: Returning home:Hardik Pandya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.