Ricky Ponting, Top 5 T20 Cricketers: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने जगातील ५ महान टी२० खेळाडूंची निवड केली. त्याने निवडलेल्या ५ क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे. रिकी पाँटिंगने ५ महान टी२० खेळाडूंची निवड करत त्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इंग्लंडचा तडाखेबाज फलंदाज जोस बटलर आणि अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान या तिघांचा त्यात समावेश केला आहे. याशिवाय, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे दोन भारतीय खेळाडू रिकी पाँटिंगने जगातील ५ महान टी२० खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केले आहेत.
जूनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केल्यापासून, हार्दिक पांड्याने अष्टपैलू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. पाकिस्तान विरूद्ध भारताला आशिया चषक 2022 मध्ये पहिल्या फेरीतील सामन्यात त्याने विजय मिळवून दिला. 'आयसीसी रिव्ह्यू शो'मध्ये पांड्याची निवड करण्याबाबत पॉन्टिंग म्हणाला की, सध्याच्या फॉर्ममध्ये हार्दिक पांड्याला तिसऱ्या क्रमांकावर ठेवणे खूप कठीण आहे. त्याने IPLमध्ये खूप छान कामगिरी केली. त्याची गोलंदाजीही आता चांगली होत आहे. त्याने घेतलेल्या विश्रांतीचा त्याला नीट फायदा झाला आहे हे स्पष्टपणे दिसते.
पॉन्टींग दुसरा निवडलेला खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह. दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडलेला असला तरी, बुमराह हा भारताचा ट्रम्प कार्ड आहे. तो त्याच्या संथ चेंडू, बाउन्सर आणि यॉर्कर्सच्या विविधतेने सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर सामना फिरवू शकतो. त्याच्या संघासाठी त्याचे योगदान कायमच महत्त्वाचे असते. माझ्या संघात जसप्रीत बुमराह टॉप-५ मध्ये आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये तो कदाचित जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. नवीन चेंडूने तो खूप प्रभावी ठरतो, असेही पॉन्टींग म्हणाला.
पॉन्टिंगने निवडलेल्या इतर खेळाडूंमध्ये बाबर आझम, जोस बटलर आणि राशिद खान यांचा समावेश आहे. आझमने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. बाबर आझमला टॉप-५ मध्ये ठेवायला आवडेल. त्याशिवाय राशिद खानला top 5 मध्येही पहिल्या क्रमांकावर आहे, असे पॉन्टींग म्हणाला. आयपीएल लिलावात आमच्याकडे पैशाची कॅप नसती, तर कदाचित तो राशिद खान असता असे पॉन्टींग म्हणाला. तसेच जोस बटलर हा देखील असा खेळाडू आहे ज्याच्याकडे सामना फिरवण्याची क्षमता आहे, असेही तो म्हणाला.
Web Title: Ricky Ponting select top 5 t20 cricketers 2 Indians make cut see who are they as Asia cup 2022 going on
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.