Join us  

IPL 2024 मधील अपयशानंतर पहिली कुऱ्हाड पडली, फ्रँचायझीने महत्त्वाच्या व्यक्तीला केलं संघाबाहेर

कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये धडक दिली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स हे फायनलच्या दुसऱ्या स्थानासाठी लढणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 5:57 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ अंतिम टप्प्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने फायनलमध्ये धडक दिली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स हे फायनलच्या दुसऱ्या स्थानासाठी लढणार आहेत. यंदाच्या पर्वात KKR ने गौतम गंभीरला मेंटॉर बनवण्याचा निर्णय यशस्वी ठरला, त्यात SRH ने पॅट कमिन्सला कर्णधार बनवून मोठा डाव टाकला. पण, मुंबई इंडियन्ससारख्या यशस्वी फ्रँचायझीला हार्दिक पांड्याला कर्णधार बनवणे महागात पडले. चाहत्यांचा रोषाचा त्यांना सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्सला १४ सामन्यांत ७ विजयासह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर गाशा गुंडाळावा लागला. रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी फ्रँचायझीला महागात पडली. पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांनीही निराश केले.

आयपीएल २०२४ चा हंगाम संपल्यानंतर फ्रँचायझी आता आयपीएल २०२५च्या तयारीला लागणार आहेत. IPL 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे अनेकांवर कात्री चालणार हे नक्की आहे. त्याची सुरुवात झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग ( Ricky Ponting ) याच्याशी फारकत घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला पुढील पर्वात पाँटिंग मार्गदर्शन करणार नसल्याची चर्चा आहे.

ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग निवृत्तीनंतर प्रशिक्षणाकडे वळला. त्याने ३ वर्ष मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद भूषविले आणि त्या काळात २०१५ मध्ये जेतेपद नावावर केले. २०१८ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात प्रशिक्षक म्हणून दाखल झाला. २०१९ मध्ये संघाने प्ले ऑफमध्ये झेप घेतली, तर २०२० मध्ये संघ फायनलमध्ये पोहोचला होता. २०२१मध्येही संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला, परंतु त्यानंतर पुढील तीन पर्वात संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. 

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या ऑफर बाबत पाँटिंग म्हणाला की, "मला कोणत्याही राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक होण्यास आवडले असते. पण माझ्या जीवनात इतरही काही बाबी आहेत. मला आता कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे. याशिवाय भारताचा प्रशिक्षक झाल्यास मी आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला मार्गदर्शन करू शकणार नाही." 

 

टॅग्स :आयपीएल २०२४दिल्ली कॅपिटल्स