भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० सामन्यांत अपेक्षित थरार पाहायला मिळत नसताना दुसरीकडे इंग्लंडमध्येच ट्वेंटी-२०त धमाकेदार कामगिरी पाहायला मिळाली. ब्लास्ट ट्वेंटी-२० लीगमध्ये समरसेट विरुद्ध डर्बीशायर यांच्यातल्या सामन्यात १८ षटकारांची आतषबाजी झाली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच संघाने हे सर्व सिक्स मारले. समरसेट क्लबने ट्वेंटी-२० सामन्यात ५ बाद २६५ धावांचा डोंगर उभा केला आणि १९१ धावांनी हा सामना जिंकला. ब्लास्ट ट्वेंटी-२० लीगमधील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली अन् लीगमधील सर्वात मोठा विजयही ठरला. या सामन्यात स्टार ठरला तो दक्षिण आफ्रिकेचा ३२ वर्षीय रिली रोसोवू ( Rilee Rossouw ) त्याने ९३ धावांची अविश्वसनीय खेळी खेळली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Rilee Rossouw: OMG! 6,6,4,6,6,6; RCBच्या माजी फलंदाजाने चोपल्या ३६ चेंडूंत ९३ धावा; संघाने मिळवला १९१ धावांनी विजय, Video
Rilee Rossouw: OMG! 6,6,4,6,6,6; RCBच्या माजी फलंदाजाने चोपल्या ३६ चेंडूंत ९३ धावा; संघाने मिळवला १९१ धावांनी विजय, Video
भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० सामन्यांत अपेक्षित थरार पाहायला मिळत नसताना दुसरीकडे इंग्लंडमध्येच ट्वेंटी-२०त धमाकेदार कामगिरी पाहायला मिळाली.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 7:23 PM