"रिंकूसारख्या अनकॅप्ड खेळाडूच्या 'या' धाडसातून त्याचा आत्मविश्वास दिसतो", दिग्गजाकडून कौतुकाचा वर्षाव

IPL 2023, KKR vs PBKS : काल रिंकू सिंगने विजयी चौकार मारून पंजाब किंग्जचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 02:51 PM2023-05-09T14:51:26+5:302023-05-09T14:53:43+5:30

whatsapp join usJoin us
Rinku Singh's decision to send Andre Russell as a non-striker in last ball of the match IPL 2023 against PBKS shows his confidence, says Mohammad Kaif | "रिंकूसारख्या अनकॅप्ड खेळाडूच्या 'या' धाडसातून त्याचा आत्मविश्वास दिसतो", दिग्गजाकडून कौतुकाचा वर्षाव

"रिंकूसारख्या अनकॅप्ड खेळाडूच्या 'या' धाडसातून त्याचा आत्मविश्वास दिसतो", दिग्गजाकडून कौतुकाचा वर्षाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

mohammad kaif on rinku singh । नवी दिल्ली : काल रिंकू सिंगने विजयी चौकार मारून पंजाब किंग्जला पराभवाची धूळ चारली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिंकू सिंगने विजयी चौकार मारून सामना आपल्या नावावर केला. या विजयामुळे केकेआरचा संघ अद्याप प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहे. खरं तर रिंकू सिंग पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघासाठी काळ ठरला. रिंकूने १० चेंडूत २१ धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार मारला. रिंकूने अखेरचा चेंडू खेळण्याचे जे धाडस दाखवले यावरून या खेळाडूचा आत्मविश्वास लक्षात येत असल्याचे भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने म्हटले आहे. 

केकेआरच्या संघाला विजयासाठी अंतिम षटकात ६ धावांची आवश्यकता होती. अशा स्थितीत पंजाबचा कर्णधार शिखर धवनने अर्शदीप सिंगवर विश्वास दाखवला. अर्शदीपने सुरूवातीचे पाच चेंडू अप्रतिम टाकून केकेआरच्या अडचणीत वाढ केली होती. अखेरच्या चेंडूत २ धावांची गरज असताना रिंकूने स्ट्राईक घेतले अन् चौकार मारला. रिंकूच्या याच धाडसाचे कौतुक कैफने केले आहे.

KKRचा विजय पण IPLनं आनंदावर टाकलं पाणी; कर्णधार नितीश राणाला आकारला मोठा दंड

अनकॅप्ड खेळाडूचे कैफकडून कौतुक 
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कैफने म्हटले, "अखेरच्या आणि निर्णायक चेंडूवर रसेलसारख्या खेळाडूला स्ट्राइक रोटेट करण्यास सांगण्याचे श्रेय रिंकूला जाते. रिंकू सिंगसारख्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूने रसेलसारख्या फिनिशरला नॉन-स्ट्रायकरवर जाण्यास सांगणे, यावरून या खेळाडूचा त्याच्या खेळीवर असलेला आत्मविश्वास दिसून येतो. हेच आयपीएलचे वैशिष्ट्ये आहे." 

 "मी हे करेनच यावर माझा विश्वास होता", विजयी चौकार मारल्यानंतर रिंकू सिंगची प्रतिक्रिया


शिखर धवनची अर्धशतकी खेळी व्यर्थ 
शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावून १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांनी २७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी नोंदवली. कोलकाताला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात ५ गडी गमावून पूर्ण केले. केकेआरला शेवटच्या षटकात सहा धावांची आवश्यकता होती. ६ धावांचा बचाव करण्यासाठी पंजाबचा कर्णधार शिखर धवनने अर्शदीप सिंगकडे चेंडू सोपवला. अर्शदीपने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आपल्या बाजूने ठेवला पण रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

विजयामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
कालच्या विजयामुळे केकेआरचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहिला आहे. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. आता केकेआरचा संघ १० गुणांसह पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत.

रिंकू-रिंकू...! मैदानात एकच जल्लोष; रसेलनकडून विकेटचा त्याग, विजयानंतर केला 'प्रेमाचा वर्षाव'


 

Web Title: Rinku Singh's decision to send Andre Russell as a non-striker in last ball of the match IPL 2023 against PBKS shows his confidence, says Mohammad Kaif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.