Join us  

आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 

रिंकू सिंग ( Rinku Singh) याला अंतिम १५ मध्ये जागा न मिळाल्याने अनेकांना संताप अनावर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 4:37 PM

Open in App

BCCI ने मंगळवारी आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. सोबत चार राखीव खेळाडूंचीही नावे जाहीर केली आहेत. १ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि भारतीय संघ दोन बॅचमध्ये अमेरिकेत पोहोचणार आहेत. या संघात संजू सॅमसन व युझवेंद्र चहल यांच्या निवडीवरून आनंद व्यक्त केला जात आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्याच्या निवडीवर नाराजीचा सूर आहे. रिंकू सिंग ( Rinku Singh) याला अंतिम १५ मध्ये जागा न मिळाल्याने अनेकांना संताप अनावर झाला आहे. कारण, रिंकू हा संघात मॅच फिनिशर म्हणून हवा, अशा अनेकांच्या भावना होत्या. तशी आशा त्याच्या कुटुंबियांनाही होती आणि म्हणूनच संघ निवडीआधीच त्यांनी फटाके आणून ठेवले होते.

T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 

आर्थिक संघर्षामुळे रिंकूला दहावीआधीच शिक्षण सोडावे लागले. वडील खानचंद्रसिंग हे खासगी सिलिंडर एजन्सीस कर्मचारी आहेत आणि ते पाठीवरून घरोघरी सिलिंडर पोहोचवतात. मुलगा मोठा क्रिकेटपटू झाला तरीही त्यांनी नोकरी सोडलेली नाही. पाच भाऊ-बहिणींमध्ये रिंकू तिसऱ्या नंबरचा. घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्याने सफाई कर्मचारी म्हणून काम केले.  सफाई कामगार म्हणून वेळ दिल्यानंतरचा वेळ खेळासाठीच असायचा. त्याचे श्रम फळाला आले.  २०२२च्या मेगा लिलावात केकेआरने रिंकूला ५५ लाख दिले आणि त्याने ते पर्व गाजवून भारतीय संघाचे दार ठोठावले.

त्याने भारताकडून १५ ट्वेंटी-२० सामन्यांत ८९च्या सरासरीने व १७६.२३ च्या स्ट्राईक रेटने ३५६ धावा केल्या आहेत. तरीही त्याला वर्ल्ड कप साठी अंतिम १५ मध्ये निवडले गेले नाही. रिंकू सिंगचे वडिल सांगतात, रिंकूची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होईल असे आम्हाला वाटले होते आणि म्हणून आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी फटाके आणले होते. पण, त्याची निवड न झाल्याने दुःखी आहोत. रिंकूलाही थोडं दुःख झालंय. त्याने त्याच्या आईला फोन केला होता आणि ही बातमी सांगितली. तो दुःखी झालाय. पण, तो अमेरिकेला जातोय असे त्याने तिला सांगितले.      

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रिंकू सिंगभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड