भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार यांनीदेखील त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्षडॉ. सुशील नागर यांनी दिली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Rishabh Pant Accident : रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत
Rishabh Pant Accident : रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत
घरी परतत असताना रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. त्याची कार रेलिंगवर आदळली.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 9:11 AM