Rishabh Pant Accident: सचिन-वीरू ते आफ्रिदी; Rishabh Pant साठी भारत-पाकच्या खेळाडूंनी केल्या प्रार्थना

Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 04:48 PM2022-12-30T16:48:30+5:302022-12-30T16:49:25+5:30

whatsapp join usJoin us
Rishabh Pant Accident: Sachin-Viru to Afridi; Prayers offered by Indo-Pak players for Rishabh Pant | Rishabh Pant Accident: सचिन-वीरू ते आफ्रिदी; Rishabh Pant साठी भारत-पाकच्या खेळाडूंनी केल्या प्रार्थना

Rishabh Pant Accident: सचिन-वीरू ते आफ्रिदी; Rishabh Pant साठी भारत-पाकच्या खेळाडूंनी केल्या प्रार्थना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण अपघात झाला. पंतच्या अपघाताने अनेक क्रिकेट दिग्गजांना धक्का बसला आहे. यातच, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह सीमेपलीकडील पाकिस्तानी स्टार क्रिकेटपटूंनी ऋषभला लवकर ठीक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन-सेहवागने केली प्रार्थना

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ऋषभ पंतसाठी प्रार्थना करणारे ट्विट केले आहे. सचिन तेंडुलकरने ट्विट केले की, 'ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा. माझ्या प्रार्थना तुझ्या पाठीशी आहेत.' टीम इंडियाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही ट्विट केले की, 'ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.'

आफ्रिदीची प्रतिक्रिया
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनेही ऋषभ पंतच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली आहे. शाहीन शाह आफ्रिदीने ट्विट करत लिहिले की, 'मी ऋषभ पंतसाठी प्रार्थना करतो.' याशिवाय हसन अलीने लिहिले की, 'गंभीर दुखापत नसेल, अशी मी आशा करतो. लवकर बरा होऊन मैदानात परत ये.'

गौतम गंभीर आणि सुरेश रैना यांनीही ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली
ऋषभ पंतची बीएमडब्ल्यू कार शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून हायवेवर रोड डिव्हायडरला धडकली. पंत रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. अपघातानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असून, प्रकृती स्थिर आहे. 

Web Title: Rishabh Pant Accident: Sachin-Viru to Afridi; Prayers offered by Indo-Pak players for Rishabh Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.