Join us  

Rishabh Pant Accident: रिषभ पंत पेटत्या कारमधून बाहेर आल्यावर नक्की काय घडलं? पाहा Viral Video

रिषभ रक्तबंबाळ अवस्थेत असतानाच काही लोक तिथे पोहोचले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 4:30 PM

Open in App

Rishabh Pant Accident, Viral Video: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. पंत दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात असताना त्याच्या आलिशान कारला अपघात झाला. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंतच्या कपाळाच्या दोन टाके पडले असून आणखीही काही ठिकाणी जखमा झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. या दरम्यान, पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पेटत्या कारमधून तो बाहेर कसा पडला आणि त्यानंतर तो रक्तबंबाळ असताना काय घडलं, याबद्दलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंत थोडा रागावलेला दिसला...

रिषभ पंतची गाडी भरधाव वेगात होती आणि याच दरम्यान पंतला डुलकी आल्याची शंका आहे. या कारणामुळे पंतची गाडी दुभाजकावर आदळली आणि पलीकडे जाऊन उलटली. यानंतर पंतच्या कारला आग लागली, मात्र पंत वेळीच पेटत्या कारमधून बाहेर आला आणि कसाबसा बचावला. कसातरी जीव वाचवून पंत गाडीतून बाहेर पडला. यावेळी तिथे उभ्या असलेल्या लोकांनी पंतला मदत केली आणि वैद्यकीय मदतीसाठी पुढील हालचाली केल्या. याच दरम्यान पंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बनवणारा एक व्यक्ती दुरूनच पंतपर्यंत पोहोचला. आपण रक्तबंबाळ अवस्थेत असूनही तो व्यक्ती व्हिडिओ बनवत असल्याचे पाहताच पंतला थोडा राग आला. त्याच्या चेहऱ्यावर तो राग स्पष्ट दिसला. पाहा तो व्हिडीओ आणि काही स्क्रीनशॉट्स-

--

या दरम्यान पंत कदाचित त्या व्यक्तीला सांगत होता की, तुम्ही व्हिडिओ का बनवत आहात. असं करू नका. त्यानंतर त्या व्यक्तीने व्हिडिओ बनवणं बंद केले. व्हिडिओमध्ये पंतच्या डोळ्याजवळून खूप रक्त वाहत आहे. यासोबतच त्याच्या ओठांवर तसेच गालावरही रक्त लागल्याचे दिसत होते.

पण महत्त्वाची बाब म्हणजे, पंतची प्रकृती स्थिर आहे. रिषभ पंतला प्रथम रुरकीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंतची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही पंतबद्दल सांगितले आहे की, त्याच्या उपचारा दरम्यान काहीही कमी पडू नये, जी वैद्यकीय मदत लागेल की त्वरित दिली जावी.

 

टॅग्स :रिषभ पंतअपघातउत्तराखंडहॉस्पिटल
Open in App