भारतीय संघानं इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ( India vs England Test Series) ३१७ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. मालिकेतील तिसरा सामना अहमदाबाद येथे २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या कसोटीत आर अश्विन ( R Ashwin) यानं अष्टपैलू कामगिरी करताना मॅन ऑफ दी मॅचचा मान पटकावला. रिषभ पंत ( Rishabh Pant) यानंही पहिल्या डावात अर्धशतक झळकावून सलग चार कसोटी सामन्यांत अर्धशतक करण्याचा विक्रम केला. ICCनंही त्यांच्या या कामगिरीची दखल घेतली आणि नव्यानं जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत आर अश्विननं अष्टपैलू खेळाडूंमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. पण, यात रिषभनं केलेला पराक्रम हा भारीच आहे. IPL 2021 Auction : लसिथ मलिंगाच्या जागी कोण?; Mumbai Indians या ७ खेळाडूंवर लावणार बोली!
दुसऱ्या डावात संघ अडचणीत असताना अश्विननं विराट कोहलीसह सातव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. अश्विननं १४८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०६ धावा चोपल्या. अश्विननं पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्यानं आयसीसी क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतली. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर ४०७ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. रवींद्र जडेजा ( ४०३), बेन स्टोक्स ( ३९७), शकिब अल हसन ( ३५२) आणि आऱ अश्विन ( ३३६) अशी क्रमवारी आहे.