Join us  

Rishabh Pant : रिषभ पंतची गरूड झेप; एकाही भारतीय यष्टिरक्षकाला जे जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं!

ICC Test rankings: Rishabh Pant अडखळत सुरूवात करणाऱ्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 9:31 AM

Open in App

अडखळत सुरूवात करणाऱ्या रिषभ पंतनं ( Rishabh Pant) कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केलं. इंग्लंड दौऱ्यात पदार्पणात शतकी खेळीनंतर त्याची कामगिरी फार चांगली झाली नव्हती, त्यात सतत महेंद्रसिग धोनीशी ( MS Dhoni) होणाऱ्या तुलनेनं त्याच्या प्रत्येक चुकीकडे सर्वांचे बारीक लक्ष होते. यष्टिमागील त्याच्या चुकीवर सातत्यानं टीका झाली. पण, अखेर रिषभ पंतनं ( Rishabh Pant) सर्वांची बोलती बंद केली. आता तो मॅच विनर पंत ( Match winner Pant) झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापाठोपाठ त्यानं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अविश्वसनीय कामगिरी करून जगाला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. भारतीयच नव्हे तर जगभरातील अनेक दिग्गज आता रिषभसाठी कौतुकाचा पूल बांधताना दिसत आहेत. त्यात रिषभ पंतनं बुधवारी मोठी गरूड झेप घेतली. IND vs ENG, T20 Series : ट्वेंटी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला मिळाली आयसीसीकडून भारी न्यूज; आता इंग्लंडचं काही खरं नाही!

आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ( ICC Test rankings ) रिषभनं थेट सात स्थानांची झेप घेत थेट रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) बरोबरी केली. भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ आता ७४७ गुणांसह आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ( Top 10 in ICC Test batsman ranking) सातव्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स हेही संयुक्तपणे सातव्या क्रमांकावर आहेत.  आतापर्यंत भारताच्या एकाही यष्टिरक्षक फलंदाजाला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये प्रवेश करता आलेला नाही आणि रिषभ पंतनं ते करून दाखवलं. ( Rishabh Pant becomes the first Indian Wicket Keeper to be in the Top 10 in ICC Test batsman ranking )

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवून इतिहास घडवला. रिषभ पंतनं मागील ७ कसोटी सामन्यांत ५४४ धावा कुटल्या आहेत. भारताकडून २०२०-२१मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान त्यानं कमावला आहे. सिडनी कसोटीतील ९७ धावांच्या खेळीनं भारताचं मालिकेतील आव्हान वाचवलं आणि त्यानंतर ब्रिस्बेन कसोटीतील नाबाद ८९ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला. 

आर अश्विनची अष्टपैलू चमक अन् आगेकूचआर अश्विन यानंही ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्याविरुद्धच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळेच त्यानंही गोलंदाजांच्या क्रमवारीत थेट दुसरे स्थान पटकावले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शतकी खेळीसह त्यानं एकूण ३२ विकेट्स घेतल्या. याच मालिकेतून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलनं २७ विकेट्स घेत इतिहास रचला. त्यानं ८ स्थानांच्या सुधारणेसह ३०वं क्रमांक पटकावलं.

 

टॅग्स :रिषभ पंतआयसीसीआर अश्विनरोहित शर्माअक्षर पटेल