भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना अपघात झाला. हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन बॉर्डरनजीक त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर रिषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सध्या रिषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी दिली. दरम्यान, या अपघातानंतर पंतचं वक्तव्य समोर आलं आहे. हा अपघात कसा झाला आणि त्यातून तो कसा वचावला याची माहिती त्यानं दिली. जर पंत कारमधून बाहेर पडू शकला नसता आणि उशिर झाला असता तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती. अपघातानंतर कारमध्ये मोठी आग लागली होती.
आपण स्वत:च कार चालवत होतो. कार चालवत असताना अचानक डुलकी लागली. याचमुळे कार डिव्हायडरवर आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर आपण विंड स्क्रीन तोडून बाहेर आलो, असं रिषभ पंतनं सांगितलं.
सीसीटीव्ही फुटेज आलं समोरसीसीटीव्ही फुटेजनुसार रिषभ पंतची कार लोखंडी पाईपच्या डिव्हायडरवर अत्यंत वेगाने आदळताना दिसत आहे. तसेच त्यानंतर ही कार हवेतच जोरात उडून पलिकडे जाताना दिसत आहे. यानंतरच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हिडीओ रेकॉर्ड करत रस्त्याच्या पलीकडून पंतची कार जळताना दाखवत आहे. याचवेळी एक व्यक्ती अपघातात जखमी झाल्याचे म्हणत डिव्हाडरवर काही लोकांनी झोपवलेली व्यक्ती विव्हळताना दिसत आहे.
Web Title: Rishabh Pant Car Accident fell asleep and hit the divider car team india Rishabh Pant told how the accident happened
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.